ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एमआयटी आळंदी येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग’वरील राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

शिक्षण विश्व : देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आळंदी (पुणे) | एम.आय.टी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, आळंदी येथे दिनांक १३ व १४ मार्च २०२६ रोजी “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन्स तसेच सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी या क्षेत्रात संशोधन व नवकल्पनांना प्राधान्य देऊन नवीन संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी डेप्युटी डायरेक्टर डॉ. अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतितकर तसेच डीन रश्मी लाड उपस्थित होते. या कार्यशाळेत देशभरातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. सर्व सत्रे ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित तसेच ऑनलाइन सहभागी होणाऱ्या सर्वांना या कार्यशाळेचा लाभ घेता आला.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रवीण कुमार (जेपी मॉर्गन चेस), रवी पुरस्वानी (थिसेनक्रुप मटेरियल्स) आणि कुणाल पगारिया (अमडॉक्स इंडिया प्रा. लि.) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना, त्याचे प्रकार तसेच आयटी उद्योगातील विविध उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

हेही वाचा      :              ८०० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल 

दुसऱ्या दिवशी सूर्यकांत लोखंडे (ई-झेस्ट डिजिटल सोल्युशन्स), सचिन काटकर (निटोर इन्फोटेक प्रा. लि.) आणि सार्थक नर्नोर (एज्युनेट फाउंडेशन) यांनी जनरेटिव्ह AI, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि एजेंटिक AI यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डेटासेटवर काम करण्याची संधी देखील देण्यात आली.

कार्यशाळेत चर्चिलेले प्रमुख विषय

  • कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना
  • आयटी उद्योगातील AI चे विविध उपयोग
  • व्हाइब कोडिंगसह जनरेटिव्ह AI वरील प्रात्यक्षिक सत्र
  • कॉम्प्युटर व्हिजन व नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगवरील प्रात्यक्षिक सत्र
  • एजेंटिक (स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली)
  • सायबर सुरक्षा क्षेत्रातील AI : प्रतिक्रियात्मक संरक्षणापासून पूर्वानुमानाधारित संरक्षणापर्यंत

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, संशोधनाच्या संधी आणि उद्योग क्षेत्रातील उपयोग याबाबत सखोल माहिती मिळाली. तसेच संशोधन व नवकल्पनांसाठी नवी दिशा मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या कार्यशाळेचे संयोजन डॉ. संगीता महेश बोर्डे (विभागप्रमुख, सायन्स व कॉम्प्युटर सायन्स) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुनील पंडित महाजन, प्रा. जीवन प्रल्हाद तोंडे, प्रा. मयुरी मनोज बापट, डॉ. शितल वैभव घोटेकर, प्रा. अनुपमा वर्धमान अलगनवार, डॉ. अविनाश गोधरम चौरे, प्रा. कविता प्रशांत शिंदे, प्रा. मनिषा मिलिंद पाटील, डॉ. सुनयना कुंदन शिवथरे, डॉ. शर्मिला शरद मोरे, डॉ. सचिन साहेबराव झेंडे, प्रा. पल्लवी विलास घोलप, डॉ. भालचंद्र पवार, प्रा. शुभांगी विजय गायकर, डॉ. वंदना निलेश पगार, प्रा. पल्लवी सौरभ महागावकर, प्रा. रणवीर आनंद घाटे, डॉ. संदीप महादेव ढवळे, प्रा. वैभव सोपान गलबले, डॉ. शुभांगी संजीव भंगाळे तसेच समितीतील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button