पीसीसीओईआर मध्ये इंजिनिअरिंग डिझाइन राष्ट्रीय परिषद
शिक्षण विश्व : ‘‘इंजिनिअरिंग डिझाइन ’’ क्षेत्रातील संधी व आव्हाने

पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्सची ऑनलाईन राष्ट्रीय परिषद तज्ञ प्राध्यापक व संशोधकांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.
इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्स मधील भविष्यातील आव्हाने, संधी, वेगाने विकसित होणारे संशोधन याविषयी सहभागी संशोधकांनी आपले मत व्यक्त केले. यामध्ये प्राध्यापक, संशोधक, शैक्षणिक तज्ञ आणि उद्योगक, व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा – पीसीयू ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन
या राष्ट्रीय परिषदेचे आयईटीई पुणे केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुनील सोमाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आयईटीई मुंबई विभागाचे डॉ. शशिकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्स या विषयांवर आधारित तांत्रिक शोधपत्रिकांचे सादरीकरण सहभागी अभ्यागतांनी केले.
परिषदेमध्ये मान्यवरांचा सहभाग…
पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. राहुल मापारी यांनी नेतृत्व केले. डॉ. दिपाली शेंडे आणि परिषद सह-अध्यक्ष प्रा. विजयलक्ष्मी कुंभार यांनी संयोजनात सहभाग घेतला. सहभागी प्राध्यापक व संशोधकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.