breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माझी स्वाक्षरी… माझा अभिमान… जागर मराठीचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठी भाषा दिनानिमित्त चिखली-मोशी परिसरात कार्यक्रम
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना

पिंपरी । प्रतिनिधी
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त चिखली-मोशी येथे घेण्यात आलेल्या ‘माझी स्वाक्षरी माझा अभिमान…जागर मराठीचा’’ उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिली.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, निखील बोऱ्हाडे, श्री दत्त दिगंबर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल जाधव, मंगेश हिंगणे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन वुड्सविले फेज-२ जवळील रस्ता येथे घेण्यात आला. एकाच व्यक्तीला मराठीमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या स्वाक्षरी काढून देण्यात आल्या. यावेळी मराठी स्वाक्षरी शिकवण्याचा अभिनव उपक्रम शिक्षक गोपाह वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, चिखली-मोशी हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, नितीन बोऱ्हाडे, सोनम जांभूळकर, मंगेश हिंगणे, सागर हिंगणे, जितू बोराटे, अतुल बोराटे, रविंद्र जांभूळकर, सतीश जरे, राजेश सस्ते, संदेश आल्हाट आदी उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अनेक सोसायटीतील नागरिक एकत्रित आले आणि त्यांनी विविध उपक्रमांतर्गत मराठी भाषेचा जागर घातला. दैनंदिन व्यवहारात प्रत्येकांनी मराठी भाषेचा अधिक वापर करण्याबरोबरच मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आग्रही असायला हवे. माझी स्वाक्षरी-माझा अभिमान या उपक्रमात अभिनेत्री मानसी नाईक हिसुद्धा सहभागी झाली. या उपक्रमाने पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष वेधून घेतले.
मराठी भाषेत एकाच व्यक्तीच्या ४ प्रकारच्या लफ्फेदार स्वाक्षऱ्या पिंपरी- चिंचवड करांनी सुंदर हस्ताक्षरकार गोपाळ वाकोडे यांच्याकडून काढून घेतले आहे. यापूर्वी आम्ही आमची स्वाक्षरी इंग्रजी भाषेत करत होतो. मात्र, यापुढे आम्ही आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करू असा संकल्प यावेळी नागरिकांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button