पिंपरी / चिंचवड
घरात घुसून माय लेकीचा विनयभंग : तिघांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/1609358382_molestation-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
घरात घुसून तिघांनी आई आणि मुलीचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 23) दुपारी अडीच वाजता मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथे घडली.
विनायक दगडू कांबळे (वय 60), सुमेध विनायक कांबळे (वय 31, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरात आले. फिर्यादीच्या आईसोबत गैरवर्तन करून आईला काठीने मारहाण करून जखमी केले. त्यांनतर फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करून तिच्यासमोर आरोपी सुमेध याने अश्लील वर्तन केले. फिर्यादीला दमदाटी करत तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.