पिंपरी / चिंचवड

दोघांवर खुनी हल्ला : 21 जणांवर गुन्हा, सात जणांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

उद्घाटनाच्या कार्यक्रमात दोघेजण नाचत असताना 21 जणांनी मिळून दोघांना कोयत्याने मारून गंभीर जखमी करत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री आठ वाजता एस पी कॅफे, दिघी रोड, भोसरी येथे घडली.

प्रज्वल गोपाळ मकेश्वर (वय 19) ओंकार नारायण गाडेकर (वय 18) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी प्रज्वल याचे वडील गोपाळ कुंडलिक मकेश्वर (वय 52, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्ञानेश्वर बडगे, देवा देवज्ञे उर्फ सुतार, शिवा भेंडेकर, मयूर मानकर, अजय देवरस, आकाश नाईक, दिलीप हंगे, तेजस गालफाडे, शिवा अटकलवाड, माऊली डहाळे, प्रकाश काळे, राकेश काळे, शाम विटकर, सागर खिलारे, सोन्या गुटकुले, आकाश भेंडकर, मयूर पाटोळे, ओमकार पाटोळे, हनु कांबळे, हरी पांचाळ (सर्व रा. आळंदी), प्रसाद कोल्हे (रा. दिघी रोड, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद कोल्हे याने कोणतीही परवानगी न घेता उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठीत याने लाईट आणि साऊंड लावले. या कार्यक्रमासाठी फिर्यादी यांचा मुलगा प्रज्वल आणि त्याचा मित्र ओंकार गाडेकर गेले होते. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर बडगे ‘हे लैच माजलेत. आपल्या समोर नाचतात काय. त्यांना माहित नाही का मी आळंदीचा भाई आहे. त्यांना दाखवा रे आपला दम’ असे म्हणाला.

त्यानंतर सर्व आरोपींनी प्रज्वल आणि त्याच्या मित्राला कोयत्याने, सिमेंटच्या गट्टूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारले. ‘जिवंत सोडू नका. यांना कापून टाका’ असे मोठमोठ्याने ओरडून आरोपींनी दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी आकाश भेंडकर, प्रकाश काळे, तेजस गालफाडे, हरी पांचाळ, राकेश काळे, ओमकार पाटोळे, मयूर पाटोळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button