breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महापाैर कक्षा’तून होणार व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे महापालिका सर्वसाधारण सभा

  • मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृह राहणार बंद

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृह बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मे महिन्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी ( दि.20 ) महापाैर कक्षातून ऑनलाईन होणार आहे. या सभेसाठी पदाधिकारी, गटनेत्यांनी त्यांच्या कॅबिनमधून तर नगरसेवकांनी क्षेत्रीय कार्यालय अथवा आपल्या घरुन ‘गुगल मिट’द्वारे सभेत सहभागी व्हावे, अशा सुचना दिल्या आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यातील विविध महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार तीन महिन्यात सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद रद्द होण्याची तरतूद आहे. त्यामुळे काही तहकूब झालेल्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आलेल्या आहेत.

कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव विचारात घेता राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायंतीनी विषय समिती सभा, सर्वसाधारण सभा नियमितपणे घ्याव्यात. त्यासाठी व्हिडीओ कॉन्फरस माध्यमाचा अवलंब करावा, असे स्पष्ट आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन होत आहेत. यापुर्वी महापौर, आयुक्त, नगरसचिव, पदाधिकारी आणि गटनेते सभागृहातून तर उर्वरित नगरसेवक ‘गुगल मिटद्वारे’ आपल्या घरुन सभेत सहभागी होत होते. परंतू, राज्यात कोरोना धोका सर्वाधिक वाढला आहे. अनेकांना कोरोनाचे संक्रमण होत आहे. आरोग्य आणाबाणी होवून बेड उपलब्ध नाहीत. रेमडेसीवर इंजेक्शन मिळत नाहीत. तसेच राज्यात जमावबंदी आदेश लागू आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येत नाही. याकरिता मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृह बंद ठेवून महापाैर कक्षातून सभा ऑनलाईन होणार आहे.

अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”राज्य सरकारच्या आदेशानुसार ऑनलाईन सभा व्हिडीओ काॅन्फरन्सिंग द्वारे होणार आहे. महापाैर कक्षातून महापाैर माई ढोरे सभेला उपस्थित राहणार आहेत. तर पदाधिकारी, गटनेते हे त्यांच्या कॅबिनद्वारे तर नगरसेवकांना गुगल मिटची लिंक दिली आहे. सभा सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे लिंक अॅक्टीव्ह करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button