‘मुळा नदीचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात पूर्ण करा’; नाना काटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-2024-07-19T093323.212-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, दापोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, सांगवी व बोपोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मूळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम हे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून या पुलाचे काम ९५% पूर्ण झाले असून बाकीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, हा पूल खुला केल्यास ब्रेमेन चौक, औंध रायेत आणि खडकी रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांची वाहतुकीच्या त्रासातून सुटका होणार आहे.
हेही वाचा – Ground Report । अजित गव्हाणेंचा झाला ‘अभिमन्यू’ : माजी आमदार विलास लांडे यांनी बंडाच्या फुग्यातील हवा काढली!
संयुक्त प्रयत्नातून राबविलेल्या या प्रकल्पाचा उद्देश महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा होता पुल बांधणीसाठी खर्च हा पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही महानगरपालिका मिळून ५०-५०% असा केला आहे. या पुलाची रुंदी चारपदरी रस्ता व पदपथासह १८ मीटर असून पुलाची लांबी ५४० मीटर (पुणे बाजू) ९५ मीटर (पिंपरी चिंचवड बाजू) अशी असून या पुलाच्या प्रकल्पाची किंमत ३२.६३ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आला असून पुलाचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण केले असून. हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत आहे,
तरी माननीय आयुक्त महोदय वर नमूद सांगवी व बोपोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मूळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून ते काम लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा व नागरिकांची वाहतुकीच्या त्रासातून सुटका करण्यात यावी, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.