Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतीय जनता पार्टी एक सशक्त राष्ट्राच्या निर्माणासाठी समर्पित पक्ष; आमदार शंकर जगताप

पक्षाच्या ४५ व्या स्थापना दिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये विविध कार्यक्रम

पिंपरी- चिंचवड | भारताला एक मजबूत, समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर स्थापित करण्यासाठी कटिबद्ध असणारा भारतीय जनता पार्टी (भाजपा) राजकीय पक्ष आहे. स्थापनेपासूनच, भाजपाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि लोकहिताच्या विषयांवर आवाज उठवून भारतीय लोकशाहीत प्रभावी भूमिका बजावली आणि भारतीय राजकारणाला नवीन आयाम दिले, असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा नुकताच पार केला. भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचं हे यश असून याच पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या ४५ व्या स्थापना दिवसानिमित्त ‘मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन’ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. यानिमीत्त चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके यांच्या यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमांवेळी ते बोलत होते. ऑनलाइन संमेलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा  :  विधायक: आमदार जगताप यांची पुस्तक तुला, वाचनालयांना होणार मोफत वाटप!

तत्पूर्वी, ध्वजारोहण व महाराष्ट्र गीताने ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी सर्व पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी श्रीराम नवमी आणि भाजपा स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी, सरचिटणीस नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेविका सविताताई खुळे, अश्विनीताई चिंचवडे, रवींद्र देशपांडे, मनोज तोरडमल, उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, बिभीषण चौधरी, योगेश चिंचवडे, युवा नेते दीपक भोंडवे, संकेत चोंधे, आदेश नवले, सचिन शिवले, भगवान निकम, भूषण पाटील, कैलास रोटे, योगेश महाजन, रवींद्र ढाके, मनोज पाटील, हेमंत ढाके, शंकर पाटील आदी उपस्थित होते.

एक महान ‘जागतिक शक्ती’ आणि ‘विश्वगुरू’….

आमदार शंकर जगताप म्हणाले की, ६ एप्रिल, १९८० रोजी नवी दिल्लीतील कोटला मैदानावर कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात भाजपाची स्थापना झाली, ज्याचे पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी होते. भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहोचला, याचे सर्वात मोठे श्रेय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे असून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली दाद आणि भविष्याच्या वाटचालीसाठी केलेले मार्गदर्शन निश्चितच मोलाचे आहे. भारतीय जनता पार्टी एक मजबूत, सशक्त, समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी भारताच्या निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील आहे. आधुनिक दृष्टिकोन असलेला एक प्रगतीशील आणि प्रबुद्ध समाज, जो प्राचीन भारतीय सभ्यता आणि संस्कृती आणि तिच्या मूल्यांपासून प्रेरणा घेऊन एक महान ‘जागतिक शक्ती’ आणि ‘विश्वगुरू’ म्हणून जागतिक स्तरावर स्थापित होईल, अशा राष्ट्राची कल्पना पक्ष करतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button