Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाचे निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर केले मतदान : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीकरिता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.

यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी आज मी मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. लोकशाहीने दिलेली ही ताकदच आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलू शकते. मतदान करणे हे केवळ आपले कर्तव्य नसून, येणाऱ्या पिढीसाठी सुदृढ आणि सक्षम शहर घडवण्याची जबाबदारी आहे.”

हेही वाचा      :        पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : पहिल्या दोन तासांत ६.५६ टक्के मतदान

तसेच “सर्व पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या लोकशाहीला बळकटी द्यावी,” असे आवाहन केले. मतदान प्रक्रियेदरम्यान नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून, विविध मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती वाढताना पाहायला मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button