breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये बालकांसाठी ‘मिशन नियमित लसीकरण’ मोहीम

पिंपरी |महाईन्यूज|

क्षयरोग, पोलिओ, गोवर-रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिल्स इन्फ्लूएंझा टाइप बी, अशा आजारांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेकडून ‘मिशन नियमित लसीकरण मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शून्य ते दोन वर्ष वयोगटामधील लहान मुलांचे आणि सर्व गर्भवती महिलांना डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे लसीकरणापासून वंचित राहिलेले व गळती झालेल्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. सद्यःस्थितीत बालकांमधील आजारपण व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण लसीकरण किमान ९० टक्के करण्याचे ध्येय निश्‍चित केले आहे. या मोहिमेमध्ये अतिजोखमीचे क्षेत्र आणि अतिजोखीमग्रस्त लाभार्थी (पल्स पोलिओनुसार) यांची निवड केली जाईल. लसीकरण पथकात एक वैद्यकीय अधिकारी, दोन नर्स, दोन आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असेल.

स्थलांतरित होणाऱ्या झोपडपट्ट्या, बांधकाम ठिकाणे, पालावर, वीटभट्ट्या, स्थलांतरित, नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, ग्रामीण भाग येथील नियमित लसीकरणापासून सुटलेले किंवा वंचित राहिलेले, लसीकरणास नकार दिलेला अशा नवजात बालकांचा शोध घेण्यात येईल. तसेच, गेल्या तीन वर्षांत गोवर व इतर लसीकरणाने टाळता येणारे आजारांचे उद्रेक झालेली ठिकाणे, उपेक्षित घटकांचा समावेश आहे. मध्यमस्तरात झोपडपट्टीसदृश चाळी आणि उच्चस्तरात हाउसिंग सोसायट्यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button