पिंपरी / चिंचवड

मिशन- PCMC: “सुलक्षणा शिलवंत धर: विकासासाठी निर्भीड वचन

”आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित भविष्य — प्रत्येक नागरिकासाठी प्रत्यक्ष बदलाची हमी

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २०, संत तुकाराम नगर येथून डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. घोषणेनंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, स्थानिक नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आरोग्य, शिक्षण आणि व्यसनमुक्त समाज ही त्यांच्या प्रचाराची मुख्य सूत्रे असून, त्यांनी मांडलेली भूमिका प्रभावी ठरत आहे. “YCM रुग्णालय हे केवळ उपचाराचं ठिकाण नाही, तर हजारो कुटुंबांची शेवटची आशा आहे,” असे सांगत त्यांनी रुग्णालयात अधिक कर्मचारी नियुक्ती, नवीन कॅन्सर व किडनी विभाग सुरू करणे तसेच NICU चा विस्तार करण्यावर भर दिला. मजबूत आरोग्यव्यवस्था उभारणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  सीमेड्यू स्कूल ऑफ प्रो-एक्सप्रेशनिझमचा डिझाईन एज्युकेशन फेस्टिव्हल २०२६ मध्ये सक्रिय सहभाग

शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना डॉ. धर यांनी पंडित दीनदयाळ शाळेचे मराठी–इंग्रजी माध्यमात रूपांतर करून शिक्षण सर्वांसाठी खुले करण्याचा निर्धार व्यक्त केला. “महागड्या फीमुळे कोणाचंही स्वप्न थांबू नये. शिक्षण हा व्यवसाय नाही, तो प्रत्येक मुलाचा हक्क आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

तसेच, परिसरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या समस्येकडे लक्ष वेधत त्यांनी ड्रग्सविरोधातील लढा तीव्र करण्याचा इशारा दिला. “ड्रग्स दिसत नाहीत, पण ते आपल्या मुलांचं भविष्य गिळत आहेत. ही लढाई उद्याची नाही, आजची आहे,” असे सांगत मुलांचे भविष्य वाचवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रचारादरम्यान त्यांच्या स्पष्ट भूमिका, सामाजिक जाणिवा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रभाग क्रमांक २० मध्ये निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित भविष्य — ही केवळ आश्वासनं नाहीत, तर माझी जबाबदारी आहे. सामान्य माणसाच्या जीवनात खरा बदल घडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे, निर्भीडपणे आणि सातत्याने काम करेन.”

— सुलक्षणा शिलवंत-धर, उमेदवार, राष्ट्रवादी श.प. प्रभाग- 20.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button