breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शेवटच्या घटकांतील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता हाच संकल्प!

भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना

कृष्णानगर येथील मंदिरांच्या प्रस्तावित कामांचे भूमिपूजन

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील शेवटच्या घटकांतील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणे आणि विकसित शहर घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

भोसरी विधानसभा मतदार संघातील कृष्णानगर येथे रायरेश्वर प्रतिष्ठाणच्या माध्यमातून श्री. रायरेश्वर मंदिरासाठी सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी कृष्णानगर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील स्थानिक नागरिक व भाविकांकडून याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली होती.

भूमिपूजन कार्यक्रमासाठी यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी खैरे, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्रतिष्ठाण, श्रीमंत छत्रपती शिवाजी पार्कचे सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेविका योगीता नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, नितीन बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे, निखील बोऱ्हाडे, अतूल बोराटे, निलेश तळेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा  –  मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात दिसणार रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना पक्षनेतृत्वाचा फोन

आमदार लांडगे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रभागनिहाय प्रलंबित विकासकामे निवडणूक आचारसंहितामुळे रखडली होती. ‘‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’’ च्या माध्यमातून नागरी समस्या आणि पावसाळा पूर्व कामे, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सोसायटीधारकांच्या समस्या, अशी कामे प्राधान्याने मार्गी लावली जात आहेत.

गंधर्व एक्सलन्स्‌ सोसायटीच्या सीमा भिंतीचा प्रश्न मार्गी…

भोसरी विधानसभा मतदार संघातील गंधर्व एक्सलन्स्‌ सोसायटी, मोशी येथील सीमाभिंत कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या सोसायटीमध्ये सुमारे ३ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर सीमा भिंतीचे काम मार्गी लावावे, अशी मागणी होती. त्यानुसार आज कामाला सुरूवात करण्यात आली. तसेच, गंधर्व एक्सलन्स्‌ ते मंत्रा मुव्हमेंट पर्यंतचा रस्ता अपूर्णावस्थेत आहे. तो मार्गी लावावा. या करिता रहिवाशांनी सूचवले होते. सदर रस्त्याचे काम आगामी आठवडाभरात सुरू करु, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी दिले. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, जालिंदरनाथ जाधव, जयश्री, मोरे, ललीता मजगे, नितू सिंग, सविता काटकर, अश्विनी कुंभार, संतोष माळी, भिकन दुसाने, मनोज वाघ, अंकुश घोंगे, ज्ञानेश्वर साळवे, जगदीश पाटील, निसर्ग पारधी, प्रकाश मोरे, निलेश कोतवाल यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button