Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विविध राज्यातील माध्यमकर्मीना ‘‘वेस्ट टू एनर्जी’’ ची भुरळ!

प्रकल्प अभ्यास दौरा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामाचे केले कौतूक

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाश्वत घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यांतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मोशी येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण साखळी, तांत्रिक प्रक्रिया व त्यातून होणारे पर्यावरणीय लाभ यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

या अभ्यास भेटीदरम्यान महानगरपालिकेच्या वतीने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत केले. यावेळी उप अभियंता प्रदीप धेंडे यांच्यासह पंजाबमधील पंजाबी जागरणच्या तेजींदर कौर, पंजाब केसरी ग्रुपच्या वंदना, हिमाचल प्रदेशमधून हिमाचल दस्तकच्या आशा भारद्वाज, दैनिक भास्करच्या आंचल चौहान, चंदीगढमधून दैनिक ट्रीब्युनच्या कविता राज, हिंदुस्थान टाईम्सच्या अनिशा सरीन, द संडे गार्डियनच्या तरूनी गांधी, पीटीआय टीव्हीच्या नेहा शर्मा, अर्थ प्रकाशचे रंजू ऐरी, चंदीगढ पत्र सूचना कार्यालयाच्या संचालिक सपना, कार्यालय सहाय्यक सुनिता मोझा तसेच मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या विकेंद्रित कचरा व्यवस्थापन मॉडेलमुळे शहरातील सर्व ३२ प्रभागांमध्ये १०० टक्के ओला व सुका कचरा वेगळा करून दारोदारी संकलन करण्यात येत असून, ५०४ जीपीएस सुसज्ज वाहनांद्वारे एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्रातून रिअल टाइम देखरेख केली जाते. नागरिकांमध्ये कचरा विभाजनाची सवय निर्माण करण्यासाठी जनजागृती पथके कार्यरत असून, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाते.

हेही वाचा –‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाडक्या बहिणींना लाभ; महिला व बालविकास सचिवांचे आदेश

1440 टन कचऱ्यावर नियमित प्रक्रिया…

पत्रकारांना उप अभियंता प्रदीप धेंडे यांनी माहिती देताना सांगितले की, शहरातून दररोज गोळा होणारा सुमारे १,४४० टन कचरा विविध प्रकल्पांद्वारे पुनर्वापर व ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येतो. मोशी येथील ७०० टन प्रतिदिन क्षमतेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात आतापर्यंत २ लाख टनांहून अधिक सुका कचरा प्रक्रिया करून १४.५५ कोटी युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय ५०० टन प्रतिदिन क्षमतेचा कंपोस्ट प्रकल्प, ५० टन प्रतिदिन हॉटेल कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प आणि १,००० टन प्रतिदिन क्षमतेची मटेरियल रिकव्हरी सुविधा कार्यरत आहे.

प्रकल्प अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक…

प्लास्टिक-टू-फ्युएल प्रकल्प, बांधकाम व राडारोडा पुनर्वापर युनिट्स, मॅग्नेटिक प्लाझ्मा तंत्रज्ञानाद्वारे धोकादायक कचऱ्याची प्रक्रिया, ई-कचरा केंद्रातून दुरुस्त केलेले लॅपटॉप महापालिका शाळांना देणे तसेच लेगेसी वेस्ट बायो-मायनिंगद्वारे १० लाख घन मीटरपेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या भेटीदरम्यान मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दूरध्वनीद्वारे पत्रकारांशी संवाद साधून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची तांत्रिक बाजू, कार्यक्षमता, पर्यावरणीय परिणाम तसेच पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्नांचे सविस्तर निरसन केले. या अभ्यास भेटीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे शाश्वत कचरा व्यवस्थापन मॉडेल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे पत्रकारांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button