ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘‘पाणीबाणी’’ टाळण्यासाठी उपाययोजना!

आमदार शंकर जगताप यांची बैठक : महापालिका प्रशासनाला दिल्या सूचना

पिंपरी-चिंचवड । पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण सेक्टर २३ येथे आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक पार पडली. आगामी मार्च ते मे या उन्हाळी कालावधीत पाणीटंचाई व वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणी व्यवस्थापनाला अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी त्यांनी ठोस निर्देश दिले.

धरणातून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणी उचलले जात असताना जवळपास २५ टक्के पाणी गळतीमुळे वाया जात असल्याची गंभीर बाब आमदार जगताप यांनी अधोरेखित केली. गळती रोखण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक मोहीम राबवून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महापालिका हद्दीबाहेरील बांधकामांना होणारा पाणीपुरवठा तात्काळ थांबवण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडावा, तसेच अनधिकृत नळजोडांवर विशेष मोहीम राबवून मोटार पंप बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले.

हेही वाचा      :              अमेरिका-इराण तणाव वाढला; भारतीयांना इराण सोडण्याचे सरकारचे आवाहन 

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नियोजन

शहराची सुमारे ४० लाख (अंदाजे ३ लाख फ्लोटिंग) लोकसंख्या लक्षात घेऊन दरडोई पाणीपुरवठ्याचे प्रमाण निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. नव्या सोसायट्या व गृहप्रकल्पांमुळे वाढणाऱ्या मागणीचा विचार करून दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच औद्योगिक क्षेत्रातील पाणी वापराचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचेही निर्देश दिले.

सांडपाणी पुनर्वापर व रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर

पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त वापरासाठी सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा सक्तीने पुनर्वापर करण्याचे धोरण आखण्याची सूचना आमदार जगताप यांनी केली. शहरात सरासरी २१० ते २५० मिमी पाऊस पडत असून यंदा २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तरीही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत पावसाच्या पाण्याची साठवण व भूजल पुनर्भरणासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

समन्वयातून नियमित पाणीपुरवठ्याचा निर्धार

या बैठकीला पक्षनेते प्रशांत शितोळे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडकरांना नियमित, नियोजनबद्ध व पारदर्शक पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले. शहराच्या दीर्घकालीन पाणी सुरक्षेसाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“पिंपरी-चिंचवडकरांना नियमित, स्वच्छ आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा मिळणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ६५० एमएलडी पाणी उचलूनही २५ टक्के गळती होणे हे स्वीकारार्ह नाही. गळती रोखण्यासाठी विशेष तांत्रिक मोहीम राबवू, अनधिकृत नळजोडांवर कठोर कारवाई करू आणि सांडपाण्याच्या पुनर्वापरासह रेन वॉटर हार्वेस्टिंगला गती देऊ. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभी करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वयाने ठोस निर्णय घेऊ.”

– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button