Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेजचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात

शिक्षण विश्व : माजी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन सन्मान

पिंपरी-चिंचवड : मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेजचा ९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. “स्थापना दिन म्हणजे केवळ स्मरणरंजन नव्हे, तर ज्या मूल्यांवर संस्थेची उभारणी झाली त्या मूल्यांचा गौरव करण्याचा दिवस,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या समारंभाला संस्थेच्या संस्थापक सौ. जयश्री गवळी, श्री. मनिकंदन नायर, मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर, स्थापना वर्षातील माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत, शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा आढावा घेतला.

हेही वाचा –  पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस, रस्ते तुंबले, अनेक भागात कमरेइतकं पाणी

माजी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी त्यांच्या आठवणी शेअर करत शाळेबद्दलचा अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लेझीम, संगीत, नृत्य आदी सांस्कृतिक कला गुण सादर करत सर्वांचे मन जिंकले. विशेष आकर्षण ठरले ते इंटर-हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्तम गायकतेचा कस लावला. वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” या देशभक्तिपर गीताने झाली. या निमित्ताने मास्टर माईंड स्कूलच्या ९ वर्षांच्या प्रवासातील सिद्धता, गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा वारसा यांची झलक पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आज शाळेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त मन अगदी भरून आलं आहे. एका छोट्याशा कल्पनेपासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास आज वटवृक्षासारखा विस्तारला आहे. या शाळेचा उद्देश केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे नव्हता, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि चारित्र्य यांची जाणीव रुजवण्याचा होता. गेल्या ९ वर्षांत शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण टीम यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानते. विशेषतः माजी विद्यार्थी आजही शाळेशी जोडलेले आहेत, हे आमच्यासाठी अभिमानाचे आणि प्रेरणादायी आहे. शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे ठिकाण नाही, ती माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. पुढील वर्षांमध्येही आम्ही शिक्षणासोबत संस्कार, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर समतोल साधत राहू.

– जयश्री गवळी, संस्थापक,मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group