Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस, रस्ते तुंबले, अनेक भागात कमरेइतकं पाणी

Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, आजपासून पुन्हा राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राज्यातील पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. अनेक भागात रस्ते तुंबले आहेत तर काही भागात रस्त्यांवर कंबरेइतकं पाणी साचलं आहे.

रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस, नागोठणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी

रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढला आहे. आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका रोहा आणि सुधागड तालुक्यातील पाली नागोठणे शहरामध्ये बसलेला पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातल्या कुंडलिका आणि सुधागड तालुक्यातल्या पाली विभागातून जाणाऱ्या अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे सकल भागात पाणी साचलं आहे. नागोठणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे येथील नागरिक आता सुरक्षित स्थळी जात आहेत. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागोठणे मधील एसटी बस स्थानक देखील पाण्यात गेल्यामुळे येथील प्रवाशांची तारांबळ उडाले तर तिकडे अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे पाली खोपोली रस्ता बंद अवस्थेत पडलाय.

खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली धोक्याचे पातळी

खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याचे पातळी ओलांडली आहे. नगरपरिषदेने सायरन देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.जगबुडीचे पाणी मटन मार्केट परिसरामध्ये शिरलं आहे. जगबुडी नदी शेजारील सर्विस रोड पाण्याखाली गेल्यामुळे खाडी पट्ट्यातील गावांचा खेडमध्ये येणारा जवळचा मार्ग बंद झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका कायम आहे. .

हेही वाचा –  भुजबळ चौक-वाकड परिसरातील सर्विस रस्त्यांवरील खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना

पुणे शहरासह परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस

पुणे शहरासह परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 2000  क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीत 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण साखरी क्षेत्रात सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पुणे शहरातील भिडे पुलाला पाणी लागलं आहे. पाऊस असाच राहील तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. लोणावळा लगतच्या मळवली ते देवळे गावचा संपर्क तुटलाय. ओढे-नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलंय. पुणे-लोणावळा रेल्वेतून हा परिसर कसा जलमय झालाय, हे टिपण्यात आलाय. सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी होतं आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागतोय.

नाशिक जिल्ह्यातही पावसाचा धुमाकूळ, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ 

नाशिक जिल्ह्यात देखील सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. आज नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्रंबकेश्वरमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील काही भागात रस्त्यावर पावसाचं पाणी साचले आहे. शहरातील रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत असल्याने शहरातील मुख्य चौकात रस्ते जलमय झाले आहेत. अर्धा एक तासातच रस्ते जलमय झाल्यान मान्सून पूर्व कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button