मोरया नगरमध्ये भुयारी केबलचे काम अखेर मार्गी!
नागरिकांना दिलासा : नगरसेवक सचिन तापकीर यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड | चऱ्होली प्रभाग क्रमांक ३ मधील मोरया नगर, ताजणे मळा परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भुयारी केबल टाकण्याचे काम प्रलंबित होते, ज्यामुळे रस्ते खोदकाम, अपूर्ण कामे आणि वारंवार अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
भाजपा आमदार महेश लांडगे आणि मा. महापौर नितीन काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सचिन तापकीर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि संबंधित विभागांच्या सहकार्यामुळे अखेर भुयारी केबल टाकण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. या कामामुळे वारंवार होणारे खोदकाम कमी होणार असून वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सेवांमधील व्यत्ययही कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना या सुधारणा मोठा दिलासा देणार आहेत आणि परिसरातील मूलभूत सुविधांच्या अधिक सक्षम विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध!
दरम्यान, नगरसेवक सचिन तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित काम केले गेले. चोविसावाडी येथील ड्रेनेज चेंबर आणि वडमुखवाडी येथील रस्त्यात मोठा खड्डा निर्माण होऊन त्यात पाणी साचत होते. दोन्ही कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. नगरसेवक सचिन तापकीर यांनी सांगितले की, “परिसरातील सुविधा अधिक सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे आणि नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे ही आमची प्राथमिकता आहे.”
याशिवाय, अलंकापुरम रोडवरील साईड पट्टीची दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. वाहतुकीस त्रास होऊ नये व ट्रॅफिकची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी नियोजनपूर्वक हे काम रात्रीच्या वेळेत केले गेले.
“मोरया नगरमधील नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी केबल टाकण्याचे काम तसेच रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. हे काम वेळेत आणि नियोजनपूर्वक पूर्ण करणे आमच्या प्राथमिकतेत होते, कारण अपूर्ण कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे गरजेचे होते. आम्ही केवळ भुयारी केबल नव्हे, तर ड्रेनेज चेंबर, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा सुस्थितीत ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतो. नागरिकांच्या तक्रारी आम्ही त्वरित नोंदवतो आणि त्यावर तत्काळ उपाय करतो. भविष्यातही मोरया नगरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत.”
– सचिन तापकीर, नगरसेवक, चऱ्होली.




