ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अश्लील मेसेज करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकजण अटकेत
![Man arrested for molesting woman with obscene messages](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/pjimage-8.jpg)
पिंपरी चिंचवड | घरकाम शोधण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज व फोन करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि. 13) सायंकाळी शिंदेवस्ती, मारुंजी येथे घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.समाधान वाघ (रा. मारुंजी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मागील दोन महिन्यांपूर्वी मारुंजी येथे घरकाम शोधण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आरोपीला मोबाईल क्रमांक दिला होता, परंतु आरोपीने त्याचा गैरफायदा घेत फिर्यादी महिलेला अश्लील मेसेज व फोन करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.