breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीसाठी पिंपळे निलख येथे महामृत्यूंजय जप

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराचे नेते व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करीत पिंपळे निलख येथील श्री गणपती मंदिरात महामृत्यूंजय जप करण्यात आला.

कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान व माजी नगरसेविका आरती चोंधे यांच्या पुढाकाराने परिसरातील महिलांनी मृत्यूंजय जपाचे पठण केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

चिंचवड मतदारसंघाचे तीन वेळा आमदार असलेले लक्ष्मण जगताप यांची प्रकृती स्थिर आहे. बाणेर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जगताप हे अतिदक्षता विभागात आहेत. ते व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे, असे सांगितले जाते.

माजी नगरसेविका आरती चोंधे म्हणाल्या की, लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रकृतिमध्ये लवकरात लवकर सुधारणा होऊन सुखरूप घरी यावे, अशी प्रार्थना आम्ही गणरायाच्या चरणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button