पिंपरी / चिंचवड

मधुकर बच्चे यांचा केमिस्ट जीवन गौरव पुरस्काराने गौरव

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मधुकर बहिरू बच्चे यांना केमिस्ट जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आपला मेडिकल व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून समाजासाठी काम करणा-या मान्यवरांचा ऑल इंडिया केमिस्ट अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रावेत येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिवंसरा, अन्न औषध प्रशासन औषधे निरीक्षक महेश कौटिकवार, इंडियन बँक मॅनेजर श्री सिंग, पश्चिम महाराष्ट्र झोन पदाधिकारी बच्चू ओसवाल, कृष्णा डायग्नोस्टिकचे राजू मुथा, ई. सी. सदस्य मदन चौधरी, नंदूशेठ सांडभोर, कन्नन नंबियार, राहुल शेंडगे, गणेश धुमाळ, गणेश बच्चे, लाधुराम चौधरी, हरिष चौधरी आदी उपस्थित होते.

मधुकर बच्चे पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल संतोष खिंवसरा, केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व केमिस्ट सभासद यांना धन्यवाद. मी यापुढे देखील समाज कार्यात सक्रिय राहणार आहे. हा पुरस्कार मोठे बंधू पोपट उर्फ बबन बच्चे, पत्नी रोहिणी व परिवाराच्या कायम मिळणा-या सहकार्यामुळे मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button