breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दापोडी युवासेनेकडून आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ
![Launch of Ayushyaman Bharat Yojana by Dapodi Yuvasena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/pjimage-2021-10-11T144811.936-1.jpg)
पिंपरी – सार्वजनिक नवरात्र उत्सवा निमित्त पिंपरी युवासेनेतर्फे प्रभाग 30 दापोडी -फुगेवाडी – कासारवाडी मधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या आयुष्यमान भारत योजेनेचे शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे व युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठे, युवासेना समन्वयक रुपेश कदम, शिवसेना उपविभाग एकनाथ हाके, सामाजिक कार्यकर्त्या शीला जाधव, संजय साठे, चिंचप्पा नींगडोळे, प्रभाकर हिंगे, अक्षय गायकवाड, अस्मिता कांबळे, राजू खलसे, गोरख नेटके, विजय डिग्गीकर उपस्थित होते.
ही योजना 13 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. प्रभाग 30 मधील सर्व नागरिकांनी योजेनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक युवाअधिकारी निलेश हाके यांनी केले आहे.