breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ड्राईव्ह इन व्हँक्सीन’ व ‘व्हिल ऑन व्हॅक्सीन’ सुरू करा – राजू मिसाळ

पिंपरी / महाईन्यूज

मुंबई व पुणे मनपाच्या धर्तीवर वयोवृध्द नागरीकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सीन व विकलांग नागरीकांसाठी व्हिल ऑन व्हँक्सीन चालू करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात मिसाळ यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी मनपाकडून शासकीय नियमाप्रमाणे नागरीकांना लस देण्याची व्यवस्था शहरात सुरु करण्यात आलेली आहे.

शहरात वयोवृध्द नागरीक त्याच प्रमाणे विकलांग नागरीकांना लसीकरण केंद्रावर येऊन लस घेणे त्रासदायक होत आहे. या नागरीकांना रांगेत थांबणे शक्य होत नसल्यामुळे लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत. परीणामी वयोवृध्द व विकलांग नागरीक लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मुंबई मनपाच्या धर्तीवर वयोवृध्द नागरीकांसाठी ड्राईव्ह इन व्हँक्सीन तसेच विकलांग नागरीकांना व्हिल ऑन व्हँक्सीन करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे या नागरीकांचेसुध्दा कोरोना लसीकरण पूर्ण होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button