breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मोरवाडी चौकात पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी वाया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/WhatsApp-Image-2022-05-14-at-12.26.50-PM.jpeg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना उन्हाळ्यात अनेक भागात पाणी समस्यांचे तक्रारी महापालिकेत दररोज येत आहेत. त्यातच आज शनिवारी सकाळी 11च्या सुमारास मोरवाडी चौकात फुटपाथ रुंदीकरणाचे काम सुरू असताना पाण्याची मुख्य लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असून वाया जात आहे. दरम्यान रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा परिणाम वाहतूकीवर होत आहे. दरम्यान नागरिकांची आणि वाहनचालाकांची मोठी तारांबळ होताना दिसत आहे.
आज महापालिका प्रशासनाला सुट्टी असताना याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य लाईन फुटल्याने पाण्याचे प्रेशर खूप असल्यामुळे पाणी हवेत उड नये म्हणून फुटपाथ वरती काम करणारा जेसीपी फुटलेल्या पाईप लाईन वरती उभा करून ठेवला आहे. असे असताना पाणी वाया जात आहे.