कासारवाडीतील दत्त आश्रमात उद्यापासून किर्तन सप्ताहास प्रारंभ
![Kirtan week starts from tomorrow at Datta Ashram in Kasarwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Image-2021-12-11-at-1.30.39-PM.jpeg)
सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार नामवंत महाराजांची कीर्तनसेवा
पिंपरी,प्रतिनिधी :
श्रीदत्त साई सेवा गुंज आश्रम पिंपळे गुरव रोड, कासारवाडी या ठिकाणी उद्या रविवारपासून श्री दत्त जयंती निमित्त कीर्तन महोत्सवास प्रारंभ होत असून या सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.उद्या सकाळी नऊ वाजता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व आश्विनीताई लक्ष्मण जगताप , भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे महापौर माई उर्फ उषाताई ढोरे, माजी आमदार विलास लांडे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके ,नगरसेवक शत्रुघ्न काटे ,बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड आदींच्या हस्ते या कीर्तन सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे.
सायंकाळी सहा ते ७ ते ९ या वेळेत ह भ प महेश माकणीकर यांचे किर्तन होईल .
त्यानंतर सोमवारपासून दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत अनुक्रमे ह भ प संतोष महाराज पायगुडे, ह भ प चंद्रकांत चंद्रकांत महाराज वांजळे ,ह भ प संजय महाराज पाचपोर, ह भ प अक्रूर महाराज साखरे, ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होईल .शनिवारी १८ डिसेंबरला श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा निमित्त सकाळी श्री दत्ताची पालखी नगरप्रदक्षिणा काढण्यात येईल. त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे कीर्तन होईल. रविवारी 19 डिसेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत ह भ प शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन होईल व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भव्य संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडेल दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे चार ते सहा काकड आरती व सकाळी आठ ते अकरा या वेळेत पारायण होईल. सर्व श्री दत्त भक्तांनी या कीर्तन सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त साई सेवा ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.