कविता भोंगाळे-पाटील यांचा प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल!
निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड | प्रभाग क्रमांक ५ मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कविता भोंगाळे-पाटील यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी त्यांनी महापालिका निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
देशातील सर्वात मोठ्या पक्ष असलेल्या भाजपने मला उमेदवारी जाहीर केली याबद्दल मी त्यांचे आभार मानते. “माझ्या सामाजिक कार्याची ही पोहोचपावती आहे. नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे निश्चितच विजय मिळवू,” असे कविता भोंगाळे-पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभागात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा तसेच आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासाचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यात आला. या कामांच्या जोरावर जनतेचे आशीर्वाद घेण्यात आले.
या वेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. विशेष म्हणजे महिला भगिनी मोठ्या संख्येने स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून, त्यांचा पाठिंबा उमेदवारासाठी बळ देणारा ठरत आहे.
एकूणच अर्ज दाखल करण्याच्या दिवशी उत्साही वातावरण दिसून आले असून, आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.




