‘मोफत शिक्षण देऊ म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना चंद्रकांत पाटलांनी फसवले’; काशिनाथ नखाते
![Kashinath Nakhate said that Chandrakant Patal cheated the students of Maharashtra to provide free education](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Kashinath-Nakhate-1-780x470.jpg)
पिंपरी | महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुलींना यावर्षीपासून म्हणजे १ जून पासून उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत मिळेल असे जाहीर करून सवंग प्रसिद्धी मिळवली, आता शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शिक्षण संस्थांनी विद्यार्थिनींना फिस भरण्याचा तगादा लावला आहे, मोफत शिक्षण घोषणाच ठरल्याने राज्यातील विद्यार्थिनीनां चंद्रकांत पाटलांनी फसविले अशी टीका राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चंद्रकांत पाटलांना आज कष्टकरी कामगारानी मोफत शिक्षणाचा सवाल केला. यावेळी सरचिटणीस तुषार घाटुळे, सिद्धनाथ देशमुख, ओमप्रकाश मोरया, नाना कसबे, युवराज नीलवर्ण, अनिल माने, राधा वाघमारे, वंदना कदम आदी उपस्थित होते.
हेही वाचा – राम मंदिराच्या छताला गळती का लागली? मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचं स्पष्टीकरण
नखाते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी, २०२४ यांनी महाराष्ट्रातील मुलींना अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण आणि वैद्यकीय अशा अनेक अभ्यासक्रमांसाठी जून २०२४ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून मोफत शिक्षण देण्यात येणार नसून कोणतेही शुल्क मुलींना भरावे लागणार नाही. यासाठी मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त असू नये. त्यापुढील जे शिक्षण मुली घेणार आहेत ते मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. आता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी या घोषणेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीच नाही.
महाविद्यालयाच्या भरमसाठ फीस मुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून देतात तर काही दुय्यम दर्जाचे शिक्षण घेतात अशी स्थिती आहे,काही विद्यार्थी तर शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून आत्महत्या सारख्या टोकाचे पावले उचलत आहेत हे सर्व फसलेल्या सरकारी योजनांचे परिणाम आहेत.