breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ज्युनिअर इंजिनिअर’ बनला महापालिकेचा ‘संस्थानिक’; विकासकामांना ‘खोडा’

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सह शहर अभियंता रामदास तांबे यांच्या अखत्यारीत काम करणारा एक ‘ज्युनिअर इंजिनिअर’ महापालिकेचा अक्षरश: संस्थानिक बनला आहे. अत्यंत बेजबाबदार वर्तन असलेल्या या ज्युनिअर इंजिनिअरची ओळख महापालिकेतील सर्वात भ्रष्ट व फाटक्या तोंडाचा इंजिनिअर अशी आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. यापूर्वी डॉ. श्रीकर परदेशी, श्रीनिवास पाटील यांच्यापासून अगदी श्रावण हर्डिकर आणि राजेश पाटील यांच्यासारखे प्रतिभावंत आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाभले आहेत. त्या-त्या आयुक्तांच्या कार्यकाळात शहरातील विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे देश-विदेशातील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसोबत काम करतात. महापालिका प्रशासन आणि त्या-त्या आयुक्तांनी हे पिंपरी-चिंचवडचे ‘रेप्युटेशन’ जपले आहे.

मात्र, गेल्या चार वर्षांपासून एक ज्युनिअर इंजिनिअर महापालिकेच्या जल नि:सारण आणि पर्यावरण विभागात ठाण मांडून बसला आहे. ठेकेदार, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सल्लागार, कर्मचारी यांच्यासोबत ‘त्या’ इंजिनिअरची भाषा अत्यंत उन्मत आहे. याचा नाहक त्रास या विभागाशी संबंधित लोकांना होतो. पण, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हम करें सो कायदा…भूमिका घातक…!

महापालिका प्रशासनाने एका विभागातील ज्युनिअर इंजिनिअरला सुमारे १ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प दिले आहे. या प्रकल्पांचे सर्व आर्थिक निर्णय हा ज्युनिअर इंजिनिअर घेत आहे. मात्र, त्याची काम करण्याची पद्धत हम करें सो कायदा… अशी असल्यामुळे ठेकेदार संस्था, सल्लागार या विभागाशी संबंधित कामकाज करण्यास उदासीन आणि त्रस्त आहेत. वास्तविक, या विभागाकडे पाच ते सहा ज्युनिअर इंजिनिअर असताना एकाच ज्युनिअर इंजिनिअरला हजारो कोटी रुपयांची कामांचे अधिकार देण्यामागील गौडबंगाल काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापैकी एकही प्रकल्प गेल्या चार वर्षांत पूर्ण झालेला नाही. अशा मनोवृत्तीच्या ज्युनिअर इंजिनिअरची भूमिका महापालिका आणि पर्यायाने शहराच्या विकासासाठी घातक आहे.

लोकप्रतिनिधी, वरिष्ठांना फाट्यावर मारणाऱ्याचा बंदोबस्त करा…

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रभावशाली कामगिरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि एकाच खात्यात तळ ठोकून असलेल्यांची बदली करण्याची भूमिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली. मग, शहरातील लोकप्रतिनिधी आणि त्या-त्या विभागाच्या वरिष्ठांना फाट्यावर मारणाऱ्या ‘त्या’ ज्युनिअर इंजिनिअरला फाट्यावर मारणाऱ्याचा बंदोबस्त कधी करणार? असा अशी चर्चा महापालिका अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. संबंधित ज्युनिअर इंजिनिअरच्या आततायीपणामुळे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनी महापालिकेसोबत काम करणार नाहीत. त्यामुळे शहराच्या विकासाला अडथळा करुन महापालिका आणि शहराचे नुकसान होत आहे, याची भरपाई कोण करणार? असा प्रश्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button