पिंपरी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात जोडेमारो आंदोलन
![Jodemaro agitation against Union Minister Narayan Rane at Pimpri Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/shivsena-1-1.jpg)
पिंपरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या खळबळजनक वक्त्यव्यामुळे राजकीय वातावरण चांगलच पेटल आहे. त्या विरोधात आज शिवसेनेने पिंपरी चौकात घोषणाबाजी करत राणे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले.
या प्रकरणाविरुद्ध शिवसेनेने अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात शिवसेना नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करताना दिसत आहे. शिवसेनेने पिंपरी चौकात घोषणाबाजी करत राणे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. कोंबडी चोर राणे, चाराणे, बाराणे, आठाणे अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
पिंपरी चौकात झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. पिंपरी चौकात आंदोलन केल्यानंतर आंदोलक शिवसैनिक मोरवाडी येथील भाजप कार्यालयाकडे गेले. दरम्यान शहरातील बीजेपी कार्यालयासमोरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.