breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

JNU विद्यार्थावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ फी वाढीबाबत आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर अमानुष व भ्याड हल्ला झाला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात विविध संघटनानी आंदोलन केले. तसेच संबंधितावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU ) फी वाढी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर भ्याड पद्धतीने हल्ला झाला. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदू सुरक्षा दल यांच्या कार्यकर्तांनी चेहऱ्यावर मास्क लावून व ओळख लपवून प्राणघातक हल्ला केला. या हल्यामध्ये अनेक विद्यार्थी/प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. तब्ब्ल ५ तास मारहाणीचा प्रकार चालू होता.

स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव घटना स्थळी पोहचून विद्यार्थ्यांना मदत करणे, सुरक्षिततेचा उपाय करणेकामी गेले, असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. देशात लोकशाही राहिली नसून ठोकशाही वाढत आहे. हे कृत्य संविधान विरोधी व लोकशाही विरोधी असल्याने त्या विरोधात निषेध करण्यासाठी निदर्शने आंदोलन पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी संस्था संघटनांच्या वतीने आज (मंगळवारी) करण्यात आले.

या आंदोलनात मानव कांबळे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, प्रतीक वाघमारे, सम्यक विद्यार्थी आंदोलन संतोष जोगदंड , माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मनोगत व्यक्त करत निषेध व्यक्त केला. कुल जमाते तंजीम मौलाना उमर गाझी ,मौलाना अलीम अन्सारी ,हाजी गुलजार ,अजीमुद्दीन शेख , स्टुडन्ट ऑफ इस्लामिक ऑर्गोनैझेशन रिझवान खान , प्रताप गुरव ,विशाल जाधव , सुरेश गायकवाड ,शिवशन्कर उबाळे आणि इतर असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button