पिंपरी / चिंचवड

कंपनीच्या शेअर ट्रेडींग ब्रोकर अॅपवर बनावट व खोटा इलेक्ट्रानिक अभिलेख तयार करुन गुंतवणुकदारांची फसवणुक करणा-यांस अटक

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीच्या शेअर ट्रेडींग ब्रोकर अॅपवर बनावट व खोटा इलेक्ट्रानिक अभिलेख तयार करुन गुंतवणुकदारांची सुमारे सव्वा आठ कोटी रुपयांची फसवणुक केली. याप्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून केवळ साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सागर जय जगदाळे (वय 28, रा. साई प्लेटीना चंद्रभागा कॉर्नर, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुरलीधर शिंदे (वय 44, रा. इंद्रायणीनगर भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. एक सप्टेंबर 2021 ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला.

इन्फीनॉक्स कंपीटल कंपनीच्या शेअर ट्रेडींग ब्रोकर कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर कंपनीचे डायरेक्टर आरोपी जय मावजी, निजय मेहता, निकुंज शहा, निलेश शांताराम वाणी यांनी फिर्यादी यांना दरमहा फायदा करून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर फिर्यादी यांना दरमहा कोणतीही रक्कम दिली नाही. तसेच फिर्यादी यांनी गुंतवणुक केलेली रक्कम परत न देता कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या अँपवर बनावट व खोटा इलेक्ट्रानिक अभिलेख तयार करून फिर्यादीची व इतर लोकांची एकूण आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा दाखल होवुन देखिल इन्फीनॉक्स कंपीटल कंपनीचे ऑफिस चंद्रभागा कॉर्नरजवळ रावेत पुणे येथे कामकाज चालु आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून सागर संजय जगदाळे याला अटक केली. त्याच्याकडून आठ लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कंपनीच्या आरोपी संचालकांच्या संपर्कात राहून सागर हा नागरिकांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. टॅब. दोन मोबाईल, हवालाकरीता वापरलेल्या 10 रुपयाच्या चलनी नोटा, बैंक पासबुक, बैंक चेकबुक व इतर साहित्य जप्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button