Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

आकुर्डीतील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद

शिक्षण विश्व; 150 शोधनिबंध सादर होणार

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 9 आणि 10 मे रोजी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेमध्ये सायबरटेक आणि स्मार्ट सिस्टीम्सबाबत चर्चा केली जाणार आहे. अशी माहिती संस्थेचे प्राचार्या डॉ. पी. मालती यांनी दिली.

दरम्यान या परिषदेत तब्बल 150 शोधनिबंध या कॉन्फरन्स मध्ये सादर केले जाणार आहेत. भारताच्या विविध राज्यातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक, तसेच भारताबाहेरील विविध रिसर्च स्कॉलर्स आपले संशोधन या कॉन्फरन्स मध्ये सादर करणार आहेत.
सदर परिषदेसाठी वेगवेगळ्या देशातून मान्यवर उपस्थिती दर्शवणार आहेत. तैवानचे प्रा. डॉ. शेंग लुंग पेंग, इराणचे प्रा. डॉ. फरझद मोराडपौरी, पोर्तुगलचे प्रा. डॉ. जॉन मॅन्युअल तावरेस, रोमानियाचे प्रा. डॉ. लुमिनिता मोरारू, अमेरिकेचे प्रा. डॉ. सचिन जैन, चीनचे प्रा. डॉ. वेई शियांग होन्ग, बांगलादेशचे प्रा. डॉ. मोहम्मद अबू युसुफ, कोलकाताचे प्रा. डॉ. नीलांजन डे सहभागी होतील.

तसेच भारतामधून प्रा. एस. के. सिंग, डॉ.राकेश कुमार जैन, डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. रणजीत सावंत, डॉ. प्रतापसिंह देसाई, डॉ. हर अमृत सिंग संधू, डॉ.सुदीप ठेपाडे, डॉ. सुनील ठाकरे, डॉ.निलेश उके, डॉ. अभिजीत पाटणकर, सौ. स्मिता जाधव, आणि डॉ.परीक्षित महाले यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

हेही वाचा   :  दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

या परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना, संशोधन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होईल. याचा उपयोग सिव्हिल, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग क्षेत्रातील दैनंदिन कामे अधिक सुलभतेने होतील असे कॅम्पस संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी सांगितले.

डॉ. लतिका देसाई आणि डॉ. अशोक मोरे हे या कॉन्फरन्सचे कन्व्हेनर म्हणून काम पाहणार आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डी. वाय. पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त) महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांचे मार्गदर्शन आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button