Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

राजमाता फार्मसी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आंतरराष्ट्रीय परिषद

शिक्षण विश्व : परिषदेला देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड: राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, डूडुळगाव यांच्या वतीने व इरा कॉन्सलटन्सि अँड रिसर्च ऑर्गनायजेशन यांच्या सहकार्याने “संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित डिजिटल परिवर्तन आणि साय-हबच्या पलीकडील नैतिक मुक्त ज्ञानप्रवेश” या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. परिषदेला देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संस्थेचे संस्थापक व संचालक डॉ. अभय जे. गांधी हे औषध संशोधन, नैदानिक संशोधन व वैज्ञानिक लेखन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली आयसीआरओ संस्था संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन व नैतिक ज्ञानप्रवेशाला चालना देत युवा संशोधकांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देत आहे.

परिषदेची सुरुवात ऑनलाइन तोंडी सादरीकरणांनी झाली. दुसऱ्या दिवशी (२८ फेब्रुवारी २०२६) उद्घाटन समारंभ पार पडला. डॉ. के. एस. लड्डा यांनी “हर्बल उत्पादनांच्या मानकीकरण व गुणवत्तानियंत्रणासाठी AI व केमोमेट्रिक टूल्सचे एकत्रीकरण” या विषयावर मार्गदर्शन करत औषधी वनस्पती संशोधनात आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता अधोरेखित केली. अध्यक्षस्थानी डॉ. आर. बी. जाधव उपस्थित होते.

यानंतर श्री. संतोष आवसारकर यांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित औषधनिर्मिती प्रक्रिया” या विषयावर भाष्य करत गुणवत्ता-केंद्रित रचना पद्धती व डेटा-आधारित प्रक्रियेच्या साहाय्याने औषधनिर्मितीतील गुणवत्ता कशी वाढवता येते याचे सविस्तर विवेचन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष यू. येळे होते. दुपारच्या सत्रात डॉ. मीनाक्षी पटेल यांनी ऑनलाइन माध्यमातून “कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम साहित्य विश्लेषण व संशोधन लेखन सहाय्य” या विषयावर मार्गदर्शन केले. संशोधन लेखनात AI च्या प्रभावी भूमिकेचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. अध्यक्ष म्हणून डॉ. शंकर ढोबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलाक्षी नेरकर व प्रा. प्रतिमा पोकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रियंका देवरंकर यांनी केले. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत ही परिषद यशस्वीरीत्या पार पडली.

हेही वाचा –  पंतप्रधान मोदींकडून सुरक्षा समितीची तातडीची बैठक

तिसरा दिवस : संशोधन व प्रकाशनातील AI

परिषदेच्या तिसऱ्या दिवशी (१ मार्च २०२६) श्री. तेजस सोमय्या यांनी संशोधन प्रकाशन व उच्च प्रभावी जर्नल इंडेक्सिंगमध्ये AI चे धोरणात्मक एकत्रीकरण यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. मुकेश रत्नपारखी होते. डॉ. अजिनाथ शिरसाठ यांनी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग व गुणवत्ता नियंत्रणामध्ये AI चा वापर यावर सखोल माहिती दिली. अध्यक्ष म्हणून डॉ. स्वाती देशमुख उपस्थित होत्या. तसेच श्री. सोमदत्त चौधरी यांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम औषध शोध प्रक्रिया” या विषयावर श्रॉडिंगर संगणकीय सॉफ्टवेअरच्या सहाय्याने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत संशोधनातील नव्या शक्यता उलगडून दाखवल्या. या सत्राचे अध्यक्ष डॉ. गणेश आंधळे होते.

उत्स्फूर्त सहभाग व समारोप

परिषदेत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व औषधनिर्मिती क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चर्चासत्रे, प्रश्नोत्तरांचे सत्र व प्रात्यक्षिकांमुळे सहभागींचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. समारोप समारंभात उत्कृष्ट संशोधन सादरीकरणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ही परिषद संशोधन क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देणारी ठरली असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी व नैतिक वापरासाठी दिशा दाखवणारी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

आयोजन समिती…

या परिषदेचे आयोजन खालील समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले – डॉ. जिवन एस. धुमाळ (अध्यक्ष), डॉ. ज्योती एन. कदम (सचिव), प्रा. प्रियंका एस. देवरंकर (सचिव), श्री. ओंकार अनंत (सदस्य), श्री. सौरभ शिवगुंडे (सदस्य), डॉ. अर्चना के. ठिकेकर (विद्यार्थी समन्वयक), डॉ. पी. आर. मेश्राम (सदस्य). कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल कुंभार, संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार मा. श्री. विलासराव लांडे, सचिव मा. श्री. सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांतजी लांडे, खजिनदार श्री. अजित दा. गव्हाणे, व्यवस्थापन प्रतिनिधी प्रा. किरण चौधरी, सौ. अश्विनी भोसले (रजिस्ट्रार) यांचे मार्गदर्शन लाभले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button