Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींकडून सुरक्षा समितीची तातडीची बैठक

Iran Israel War : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातही हालचालींना वेग आला आहे. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केंद्रीय सुरक्षा समितीची (CCS) तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. रात्री ९.३० वाजता ही बैठक होणार असून इस्रायल-इराण संघर्ष, भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि प्रादेशिक स्थैर्य या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शनिवारी इस्त्राईलकडून इराणवर अचानक हल्ला झाल्यानंतर संघर्ष तीव्र झाला. त्यानंतर अमेरिकेनेही युद्धात उडी घेतल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच मध्यपूर्वेत आपली युद्धनौका आणि सैन्यबळ तैनात केले होते.

या हल्ल्यांमध्ये इराणमधील अनेक लष्करी आणि नागरी ठिकाणांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. प्रादेशिक तणाव वाढत असून परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा –  महायुती सरकारचा मोठा निर्णय; जिल्हा परिषद-पंचायत समित्यांत सदस्यसंख्या वाढणार, राजकीय हालचालींना वेग

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूबाबतही चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणकडून प्रत्युत्तरादाखल इस्रायलसह अमेरिकेची लष्करी तळे असलेल्या ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे.

युद्धामुळे अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मध्यपूर्वेत, विशेषतः इराण आणि दुबई परिसरात काही भारतीय नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य स्थलांतरासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलली जाऊ शकतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button