breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरेकेड्स लावा

पिंपरी :  नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका परिक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरेकेड्स लावावेत कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सर्व विभाग प्रमुख आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या.

पुणे जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दुर्घटना घडून जीवितहानी झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महापालिका क्षेत्रात संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी तात्काळ आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 20 ठिकाणी रेशन दुकानांना मिळणार मंजुरी

पिंपरी चिंचवड शहरातील नदी घाट ,पूल, तलाव, बंधारे, उद्याने, खाणी अशा ठिकाणी नागरिक पावसाळी पर्यटनासाठी येतात. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. गरजेच्या ठिकाणी बॅरेकेड्स लावणे, तसेच धोकादायक झाडे, रस्त्यावरील खड्डे, धोकादायक फलक, मनोरे, इमारती, विजेचे डी.पी.बॉक्स व ट्रान्सफार्मर संदर्भात संबंधित विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूर्व दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सह आयुक्त इंदलकर यांनी दिल्या.

दरम्यान, सह आयुक्त इंदलकर म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आरखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांची पाणी पातळी वेळोवेळी तपासण्यात येत आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी 24 तास कार्यरत असलेले “आपत्कालीन प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी या पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button