Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

नव्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ’!

शिक्षण विश्व: पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 'दीक्षारंभ' कार्यक्रमातून वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाच्या तुकडीचे उत्साहपूर्ण स्वागत

पिंपरी चिंचवड: पिंपरी पुणे – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे वैद्यकीय पदवी (MBBS) आणि दंतशास्त्र पदवी(BDS) अभ्यासक्रमाच्या 2025–2026 च्या नव्या विद्यार्थ्यांचे ‘दीक्षारंभ’ स्वागत समारंभात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या भव्य समारंभाने विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रवासाची औपचारिक सुरुवात झाली.

या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्जन व्हाइस ॲडमिरल – आरती सरीन महासंचालक – सशस्त्र दल वैद्यकीय सेवा, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र कुलपती; डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र कुलगुरू डॉ. स्मिता जाधव; विश्वस्त व खजिनदार, डॉ. यशराज पी. पाटील, ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणेचे प्र कुलपती डॉ सोमनाथ पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणेचे कुलसचिव डॉ. जे. एस भवाळकर, शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ पी. वत्सलस्वामी, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणेच्या अधिष्ठाता, डॉ. रेखा आर्कोट, डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजचे अधिष्ठाता, डॉ. ब्रिग. एस. के. रॉय चौधरी, आदी मान्यवर उपस्थिती होते .

प्राध्यापक , प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ विद्यार्थी यांनी नवागत विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत केले.समारंभात संस्थेचे ध्येय, मूल्ये, शैक्षणिक अभ्यासक्रम, उपलब्ध सुविधा तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्वसमावेशक शैक्षणिक व्यवस्थेची माहिती देण्यात आली. यावेळी 250 MBBS आणि 100 BDS विद्यार्थ्यांचा विद्यापीठात औपचारिक प्रवेश झाला.

सर्जन व्हाइस ॲडमिरल – आरती सरीन महासंचालक – सशस्त्र दल वैद्यकीय सेवा, “आजचे वातावरण अभिमान, आशा आणि संकल्पांनी भारलेले आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करत आहात. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ हे देशातील विश्वासार्ह शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. येथे तुम्ही मानवतावादी दृष्टीकोन, नैतिक मूल्ये, शिस्त, नेतृत्व आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती आत्मसात कराल. येथील शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर सहानुभूती, नैतिकता, नेतृत्व आणि आजीवन शिक्षणाची वृत्तीही विकसित करतात. तुमची उद्दिष्टे स्पष्ट ठेवावेळेचे व्यवस्थापन करा आणि स्वतःची काळजी घेणे विसरू नका. कारण भारताला तुमच्यासारख्या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या भावी डॉक्टर्सची गरज आहे.”

मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे यांनी संस्थेची केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे, तर खरे आरोग्यसेवा नेतृत्व घडविणाऱ्या मूल्यांचे जतन करण्याची बांधिलकी अधोरेखित केली. ते म्हणाले:“आजचा दिवस आपल्या नव्या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्रवासाची सुरुवात आहे. ते उद्देश, निष्ठा आणि उत्साहाने आरोग्यसेवेच्या विश्वात प्रवेश करत आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञान व क्लिनिकल कौशल्य विकसित करत नाही, तर त्यांना खरे नेतृत्व घडवणारी मूल्येही रुजवतो. आम्हाला उत्कंठेने प्रतीक्षा आहे की हे विद्यार्थी संवेदनशील, कुशल आणि सेवाभावी आरोग्यव्यवसायिक बनतील आणि आपल्या सेवेद्वारे असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करतील.”

हेही वाचा –  गुणवत्ता महिना स्पर्धेत 360 जणांचा उत्स्फूर्त सहभाग

डॉ. भाग्यश्री. पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ), यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “दीक्षारंभ हा एक पवित्र आणि महत्त्वाचा सोहळा आहे. आज तुम्ही डीपीयूच्या विद्यार्थ्यांमध्ये सामील होत या ज्ञानमंदिरात पाऊल ठेवत आहात. तुम्ही सदैव आपल्या पालकांचे ऋणी आहात—याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. ज्ञान संपादन करणे, गतिमान राहणे, श्रद्धा वाढवणे आणि आपली अंतःशक्ती बळकट करणे हेच तुमचे कर्तव्य आहे. अंतरंग शक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती—हे तीन मंत्र तुमचे मार्गदर्शक असतील, त्यामुळे त्यांना मनाशी घट्ट जोडून ठेवा. डीपीयू येथे पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा समन्वय असून अनुभवाधिष्ठित शिक्षण तुम्हाला मोठे स्वप्न पाहण्याची आणि तरीही नम्र राहण्याची प्रेरणा देते. सुरक्षित आणि शिस्तबद्ध कॅम्पससोबत अध्यापन व अप्रशिक्षित कर्मचारीवर्ग हे आमच्या संस्थेची मूल्यं आणि वारसा अधिक मजबूत करणारे स्तंभ आहेत. डीपीयूतील तुमचा प्रवास ज्ञान, ध्येय, प्रगती आणि करुणेने भरलेला असो—हीच शुभेच्छा.”

डॉ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ), यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आमचे उद्दिष्ट केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेपुरते मर्यादित नाही; आम्ही प्रामाणिकपणा आणि करुणेची जपणूक करण्यावरही विश्वास ठेवतो.हीच खऱ्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगती, नवोन्मेषी विचारसरणी आणि करुणेने सेवा करण्याची प्रेरणा वाढीस लागेल असे शिक्षणपर वातावरण घडवण्याची आम्ही कटिबद्धता बाळगतो. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे विद्यार्थी आरोग्य क्षेत्रातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जातील आणि उत्कृष्टतेची परंपरा पुढे नेत समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत अनेकांचे आयुष्य घडवतील.”

डॉ. यशराज पी. पाटील, विश्वस्त व खजिनदार, यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘डीपीयूमध्ये उत्कृष्टतेचा ध्यास कायम अढळ आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि दूरदृष्टी असलेली शैक्षणिक चौकट यांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त क्षमतेचा शोध घेण्यासाठी सक्षम बनवतो. केवळ करिअरसाठी नव्हे, तर सतत बदलणाऱ्या आरोग्यसेवा क्षेत्रात नेतृत्व करू शकतील, अशा भविष्यवेधी दृष्टीकोनासह विद्यार्थ्यांची जडणघडण करणे हेच आमचे ध्येय आहे. ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास यांच्या बळावर समाजामध्ये उद्धार करणारे, अर्थपूर्ण बदल घडवणारे संवेदनशील आरोग्यसेवा व्यावसायिक घडवण्याची आमची वचनबद्धता अढळ आहे.”

भविष्यात आरोग्यसेवा क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प

दीक्षारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या विविध सुविधा दाखविण्यात आल्या आणि परस्पर संवाद वाढविणाऱ्या सत्रांचे आयोजन करण्यात आले. विविध आरोग्यविषयक शाखांमधून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे, टीमवर्क, नैतिकता आणि सर्वांगीण विकास यांवर विशेष भर देण्यात आला, जेणेकरून भविष्यात ते आरोग्यसेवा क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सक्षम होतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button