Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतातील पहिले ‘संविधान भवन’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित!

भारतीय राज्य घटनेचा प्रचार-प्रसारासाठी पुढाकार

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने जनजागृती

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशाची असून, भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती व्हावी. या करिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. भारतातील हे पहिले ‘संविधान भवन’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरभर अभिवादन फ्लेक्स लावले असून, या फ्लेक्सच्या माध्यमातून भारतीय संविधानाबाबत पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात जनजागृती देखील केली आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या पेठ क्रमांक 11 मध्ये संविधान भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याचे काम सुरू आहे. या संविधानभवनाचे काम प्रगतीपथावर आहे.

हेही वाचा   :    ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत उमेदवार मिळणार नाहीत? चंद्रकांत पाटलांचा दावा

आमदार लांडगे म्हणाले की, शहरात 2019 मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर ‘पीसीएनटीडीए’चे विलिनीकरण पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणामध्ये करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात हा प्रकल्प लांबणीवर पडला. महायुतीची सत्ता आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा या कामाला गती देण्यात आली. प्रस्तावित जागा ‘पीएमआरडीए’कडून महानरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. त्यानंतर या संविधान भवनाच्या टप्पा १ च्या कामाचे भूमिपूजन झाले असून, काम सुरू झाले आहे. तसेच, टप्पा- २ साठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, येत्या 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अनेक अनुयायी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांची जयंती उत्सवाच्या रूपात साजरी करतात. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन आणि त्यांच्या प्रेरणेतून साकारलेले संविधानाबाबत जागृती करणारे फलक लावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये उभारण्यात येणारे संविधान भवन विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला घटनेचा अमूल्य ठेवा प्रदान केला. त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होवून शहरात संविधान भवन उभारले जात आहे. यातून राज्य घटनेचा प्रचार, प्रसार व्हावा. जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा, असा संकल्प आहे. हे संविधान भवन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button