ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गावाच्या स्वाभिमानासाठी एकजूट : ताथवडे–पुनावळे–वाकड प्रभागात आदर्श राजकीय निर्णय

मिशन- PCMC : गावाच्या एकतेतून विकासाचा नवा अध्याय सुरू होणार!

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताथवडे–पुनावळे–वाकड प्रभागात गावहिताला प्राधान्य देणारा एक महत्त्वपूर्ण आणि आदर्श राजकीय निर्णय घेण्यात आला आहे. या प्रभागातील इच्छुक उमेदवार सौ. सुप्रिया पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. चित्रा संदीप पवार यांना जाहीर पाठिंबा देत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.

ताथवडे गावाला गेल्या आठ ते दहा वर्षांपासून प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर गाव एकसंध राहावे, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि गावकी–भावकीचे मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने निवडणूक लढवावी, अशी ठाम भूमिका सौ. सुप्रिया पवार यांनी घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय स्पर्धेपेक्षा गावाचा स्वाभिमान आणि विकास अधिक महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा     :          पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत उपक्रमाचे आयोजन 

सौ. सुप्रिया पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय गावाच्या इतिहासात कायम स्मरणात राहणारा असून, राजकीय पटलावर एक सकारात्मक आणि आदर्श उदाहरण निर्माण करणारा ठरला आहे. व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवून गावाच्या एकोप्यासाठी घेतलेला हा निर्णय ग्रामस्थांमध्ये समाधान आणि विश्वास निर्माण करणारा आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी उमेदवार चित्रा पवार यांच्या सोबत सुप्रिया पवार आणि कुटुंबियांची भेट घेतली आणि गावच्या हितासाठी पुढाकार घेतल्याबाबत आभार व्यक्त केले आहेत.

या एकजुटीमुळे ताथवडे–पुनावळे–वाकड प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सौ. चित्रा संदीप पवार यांची उमेदवारी अधिक बळकट झाली असून, आगामी काळात गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, एक गाव… एक विचार… एक उमेदवार…‘घड्याळ’ तेच… फक्त वेळ नवी…!’’ अशी घोषणा यानिमित्ताने केली आहे. त्यामुळे प्रभाग 25 मध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून, गावकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

“गावाच्या एकतेतूनच विकासाची सुरुवात होते. ताथवडे–पुनावळे–वाकड प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास, स्वाभिमान आणि विकास हीच माझी खरी ताकद आहे. गावासाठी, गावाच्या भविष्यासाठी आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”

– चित्रा पवार, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस. प्रभाग- 25.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button