TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जगताप डेअरी चौकातील स्मार्ट टॉयलेटचे प्रशासक शेखर सिंह यांच्याहस्ते लोकार्पण

स्मार्ट सिटीअंतर्गत पीपीपी तत्वावर राज्यातील पहिला उपक्रम;

इंटिग्रेटेड सिस्टीम आणि सेन्सर्स युक्त स्मार्ट टॉयलेटचा नागरिकांनी वापर करण्याचे आवाहन

पिंपरी |

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत शहरातील नागरिकांसाठी जगताप डेअरी चौक परिसरात पीपीपी तत्वावर उभारण्यात आलेल्या स्मार्ट टॉयलेटचे (स्मार्ट सार्वजनिक शौचालय) पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.


स्मार्ट सिटी मार्फत शहरामध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी १५ वर्षाच्या कालावधीकरीता पीपीपी तत्वावर (सार्वजनिक खाजगी भागीदारी) महिला व पुरुष असे स्वतंत्र कक्ष असलेले स्मार्ट सार्वजनिक शौचालय उभारण्यात येत आहे. मेडिनीला हेल्थ केअर प्रा. लि. द्वारा संचलित २६ ठिकाणी ई-टॉयलेटचे काम सूरू आहे. जानेवारी २०२३ पर्यंत संपूर्ण ई-टॉयलेटचे काम पूर्ण करण्यात येणार आहेत. गुरुवारी सायंकाळी या उपक्रमातील जगताप डेअरी चौकातील पहिल्या स्मार्ट टॉयलेटचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी शहर अभियंता मकरंद निकम, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, महाव्यवस्थापक (इन्फ्रा.) मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे तसेच मेडिनीला हेल्थ केअर प्रा. लि. व सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरामध्ये स्मार्ट टॉयलेट ही संकल्पना राबविण्यात आली आहे. स्मार्ट टॉयलेट आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काम करणारी शौचालये आहेत. यामध्ये फ्लशिंग ऑपरेट करणे सोपे असून शौचालयाचा दरवाजा उघडल्याने टॉयलेट पॅन आपोआप फ्लश होते. बटण दाबल्यावर सहज फ्लशिंग सुनिश्चित करते. टॉयलेट पॅनमध्ये एकत्रित केलेल्या प्रेशर नोजलद्वारे प्रेशराइज्ड फ्लशिंगची खात्री केली जाते. दरवाजा उघडल्यावर सेल्फ फ्लशिंग टॉयलेट, दहा वापरानंतर आपोआप फरशी साफ होते. यात अनेक अतिरिक्त इंटिग्रेटेड सिस्टीम आणि सेन्सर्स देखील समाविष्ट आहेत. राज्यातील हा पहिला उपक्रम असून जास्तीत जास्त नागरिकांनी स्मार्ट टॉयलेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

असे काम करेल स्मार्ट टॉयलेट :
स्मार्ट टॉयलेटमध्ये ऑटोमॅटिक फ्लशिंग सेन्सर, व्हॉईस असिस्टंट, फॅन, सीलिंग लाईट, पॉवर बॅकअप आदी सुविधा आहेत. या टॉयलेटचे प्रात्यक्षिक शौचालयाच्या गेटवर लिखित स्वरूपात दाखवण्यात आले आहे. टॉयलेटची डाव्या बाजूची लाईट पेटत राहते. जर लाल रंगाचा दिवा पेटत असेल तर आत कोणीतरी व्यक्ती असेल आणि हिरव्या रंगाचा सिग्नल असेल तर समजून घ्या की, हे शौचालय रिकामे आहे. जेव्हा हिरवा दिवा चालू असतो, तेव्हा त्याच्या खाली नाणी टाकण्यासाठी एक बॉक्स असतो, ज्यामध्ये १ ते ५ रुपये पर्यंतची नाणी टाकता येतील. नाणे टाकल्यानंतर सेन्सर काम करेल आणि नंतर गेट उघडेल. गेट उघडल्यानंतर व्यक्ती आत गेल्यावर ऑटोमॅटिक प्लस मिळेल, यासोबतच मॅन्युअल प्लसचीही सोय आहे. एखाद्या व्यक्तीने गेटमध्ये प्रवेश केल्यावर आणि गेट बंद करताच, एक्झॉस्ट फॅन आणि लाईट चालू होतात. शौचालयात प्रवेश करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इंडिकेटर लावले जातात. जेणेकरून शौचालयात किती पाणी आहे हे कळते. स्मार्ट टॉयलेटच्या वरती पाण्याची टाकी बसवण्यात आली असून १० वेळा वापर केल्यानंतर शौचालय स्वयंचलित तंत्रज्ञानाने फ्लश केला जाईल आणि पूर्णपणे स्वच्छ होईल. यामध्ये व्हॉईस ओव्हरद्वारे लोकांना त्याच्या वापराबाबत माहितीही दिली जाते.

स्मार्ट टॉयलेटद्वारे मिळणार या सुविधा : –

·स्मार्ट टॉयलेटचे संपूर्ण युनिट स्वयंचलित असणार आहे.
· कॉईन टाकल्यानंतर सुविधा उपलब्ध होणार.
· प्रत्येक वापरानंतर Auto Flush, Automatic Soap dispatch, Auto flush uninor इत्यादि.
· २४ तासात ५ ते ६ वेळा House Keeping द्वारे स्वच्छता
· १० वेळा वापरानंतर संपूर्ण टॉयलेटचे ऑटोमॅटीक स्वच्छता
· महिलांसाठी सॅनिटरी पॅडची विशेष सुविधा
· बेबी डायपर बदलणे आणि बेबी Feeding ची व्यवस्था.
· युपीआय स्कॅनरचा वापर करता येणार.
· स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था .
· स्मार्ट टॉयलेटची माहिती कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर येथे उपलब्ध राहिल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button