प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवजयंती निमित्त ‘शिवजयंती घराघरात, रांगोळी दारादारात’उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220324-WA0006.jpg)
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिंचवड | प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 15 मधील शाहुनगर, संभाजी नगर, पूर्णानगर, शिवतेज नगर, फुलेनगर, शिवाजी पार्क, एचडीएफसी कॉलनी या परिसरात 19 ते 21 मार्च दरम्यान ‘शिवजयंती घरोघरी रांगोळी दारोदारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात महिलांनी हिरीरीने सहभाग घेत शिवजयंती उत्साहात साजरी केली.
प्रसाद संजय ढमढेरे यांनी हा उपक्रम राबविला. घरोघरी लोकप्रबोधन व्हावे आणि श्री शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा हा या उपक्रमामागील उद्देश होता. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उद्देश सफल झाला असल्याचे ढमढेरे म्हणाले.
तसेच शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, संभाजीनगर येथे पार पडला. स्पर्धेत प्रथम क्रमांक लक्ष्मी कोकाटे, द्वितीय क्रमांक शितल मोटे, तृतीय क्रमांक अंकिता इंगळे यांनी पटकाविला. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
बक्षीस वितरण सोहळ्यासाठी विलास जेऊरकर, संजय ढेंबरे, राजाभाऊ म्हस्के, संपत बोत्रे, परबती वाडकर , यशवंत कन्हेरे, सुजित रासकर, मोना नेहते, स्वा. सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ आणि सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश पवार यांनी केले. संपत बोत्रे यांनी आभार मानले.