ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग ७ मध्ये विराज लांडे यांचा प्रचार जोरात, गव्हाणे तालीम परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

मिशन- PCMC : राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून घरोघरी प्रचार

पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विराज विश्वनाथ लांडे, अनुराधा लांडगे, अश्विनी फुगे आणि अमोल डोळस यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला गती दिली.

शांतीनगर, लांडेवाडी, गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, खंडोबामाळ, डोळसवाडा आदी भागात पदयात्रा, घरोघरी भेटी आणि सोसायटींमधील नागरिकांशी संवाद साधताना नागरिकांनी विराज लांडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी फुलहार, मिठाई आणि शुभेच्छा देऊन प्रचाराला पाठिंबा दर्शविला.

हेही वाचा      :          उद्धव–राज ठाकरे एकत्र येण्यासाठी २० वर्षे का लागली? ठाकरे बंधू म्हणाले…

विशेषतः गव्हाणे तालीम परिसरात नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त होता. तेथे ह.भ.प. राजाराम महाराज फुगे आणि विनायक राव माने पाटील यांची भेट घेऊन स्थानिक समस्या आणि विकास विषयक चर्चा केली.

विराज लांडे यांनी प्रभागातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता यासारख्या नागरी समस्यांवर प्रभावी उपाय करण्याचा ठाम निश्चय व्यक्त केला. “प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी मी सदैव रस्त्यावर उतरणार आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रभाग ७ मधील प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद दिसत असून, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागातून प्रचाराला अधिक बळ मिळवत आहेत.

प्रभागातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आदी नागरी समस्यांची शासन दरबारी प्रभावीपणे सोडवणूक करण्याचा ठाम निश्चय आहे असा विश्वास नागरिकांना दिला. वाढदिवसाचा खरा आनंद जनतेच्या आशीर्वादातच आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी मी सदैव रस्त्यावर उतरणार आहे.

– विराज विश्‍वनाथ लांडे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक ७.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button