breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड, ताथवडे भागात ५ वर्षांपासून अजूनही विजेचा लपंडाप सुरु, आयटी कर्मचारी बेजार!

महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष : सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप

पिंपरी । वाकड, ताथवडे भागात गेले १२ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भव्य गृहनिर्माण रहिवासी संकुलांची भर पडली असूनदेखील येथे गेले ५ वर्षांपासून विजेचा लपंडाप अजूनही सुरु आहे. त्यामुळे आयटी कर्मचारी बेजार झाले असून, सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

महावितरनाने कृपा करून हा विषय त्वरित मार्गी लावावा, असा आग्रह येथील मध्यम व भव्य गृहनिर्माण संकुलांमधील रहिवासी असलेलया हजारो आयटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. दिवसाला ३-४ तास रोज हा लपंडाव सुरु असून, कधी-कधी या अनास्थेमुळे या वाकड, ताथवडे रहिवासीयांना घरून काम करण्याची मुभा असून देखील कामाच्या कार्यालयात मार्गस्थ होणे भाग पडत आहे. त्यामुळे या हजारो रहिवासीयांमध्ये रोषरुपी राग व्यक्त होत असून, दिवसाला संपूर्ण संकुलावर ४०००- ५००० रुपयेचे डिझेल जेनेरेटोरसाठी देण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा    –      महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या कुठे कुठे हवामान विभागाचा हायअलर्ट

पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशनच्या माध्यमातून महावितरणासोबत गेली अनेक वर्षे बैठका घेऊनही पुन्हा एकदा ५ वर्षांनी हा विजेचं लपंडाव सुरु झाला आहे. गेले काही वर्षे हा लपंडाव फेडरेशन, महावितरण चे जुने अधिकारी श्री वायफळकर यांच्या सतत पाठपुराव्यामुळे RMU युनिट लावल्यामुळे काही प्रमाणात थांबला होता परंतु आता पुन्हा एकदा आणखी एका नवीन समस्येने महावितरण ग्रस्त असल्याचे महावितरण कडून समजले. त्यांच्या मते महावितरणच्या विद्युत उपकारणां मध्ये पावसाळी ओलाव्यामुळे हा लपंडाव सुरु आहे आणि तो कमी करण्यासाठी विद्युत प्रवाह २२kv वरून ११kv वर आणणे भाग आहे.

– सचिन लोंढे, संस्थापक, पिंपरी चिंचवड कॉपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button