ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत वसंत बोराटे आणि राष्ट्रवादी पॅनलची झंजावती प्रचारात आघाडी

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चिखली गावठाण, रोकडे वस्तीत 'परिवर्तना'चे वारे

पिंपरी-चिंचवड | निवडणुकीच्या रणधुमाळीत चिखली गावठाण, गणेश मंदिर, रोकडे वस्ती आणि महादेव नगर परिसरात प्रचाराचा धडाका उडाला आहे. या भागात वसंत बोराटे यांनी आपल्या झंझावाती दौऱ्याने मोठी आघाडी घेतली असून, त्यांना नागरिकांचा, विशेषतः महिला वर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. “केवळ आश्वासने नकोत, तर ठोस कृती करून चिखलीचा चेहरामोहरा बदलू,” असा शब्द बोराटे यांनी यावेळी दिला.

महिलांच्या समस्यांवर बोराटे यांचा थेट संवाद साधला. प्रचारा दरम्यान आयोजित कोपरा सभांमध्ये महिलांनी आपली कैफियत मांडली. अपुरा पाणीपुरवठा, स्वच्छतेचा अभाव आणि सुरक्षेचे प्रश्न यांवर महिलांनी बोराटे यांचे लक्ष वेधले. यावर भाष्य करताना वसंत बोराटे म्हणाले, “महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या दैनंदिन अडचणींचे निराकरण ही माझी पहिली प्राथमिकता आहे. सुरक्षित चिखली आणि मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” असे सांगितले.

हेही वाचा     :        प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी; राज्य निवडणूक आयुक्त   

थेट मतदारांशी संवाद..

वसंत बोराटे यांचा हा प्रचार केवळ ‘हायटेक’ स्वरूपाचा नसून, थेट मतदारांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यावर त्यांचा भर आहे. रस्ते, वीज आणि पाणी या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी अत्यंत ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे.

परिसराच्या आधुनिक विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांच्याकडे विशेष ‘व्हिजन’ असल्याचे जाणवते. संघटनात्मक आणि सामाजिक कामात सक्रिय असल्याने त्यांना जनतेच्या नाडीची अचूक ओळख आहे. ते आत्मीयतेने संवाद साधत असल्याने चिखली परिसरात सध्या बोराटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

केवळ निवडणूक जिंकणे हे ध्येय नसून, विकासाच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा, अशी संकल्पना आहे.

– वसंत बोराटे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button