भोसरीमध्ये भर दिवसा रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Rape-3.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलीला भर दिवसा रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) दुपारी भोसरी येथे घडली.
सुरज कांबळे (वय 19, रा. लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आपली बहिण आणि मित्रासोबत दुचाकीवरून जात होती. त्यावेळी आरोपीने त्यांची दुचाकी अडवली. ‘मी काय धमकी दिली तुला’ असे म्हणत मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. फिर्यादीची बहिण व मित्र तिला आरोपीच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना ‘तुमचा मर्डरच करतो’, अशी धमकी दिली. तसेच मोबाइलवर मेसेज व फोन करून फिर्यादीला त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम तपास करीत आहेत.