TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेराष्ट्रिय

‘आर्किटेक्चरल हेरिटेज’ राष्ट्रीय स्पर्धेत एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेजला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

पिंपरी, पुणे (दि. ३ एप्रिल २०२३) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनच्या हेरिटेज सेलच्या विद्यार्थ्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या ‘एक्सलन्स इन डॉक्युमेंटेशन ऑफ आर्किटेक्चरल हेरिटेज – २०२२’ या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले. अंतिम फेरी वोक्सन विद्यापीठ हैदराबाद येथे झाली. हे पारितोषिक श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील कृष्णाबाई मंदिराच्या स्थापत्यकलेचे दस्तावेजीकरण केल्याबद्दल मिळाले आहे.
प्राचार्य डॉ . महेंद्र सोनावणे आणि सहायक प्रा. ए.आर. अभिषेक रांका यांच्या मार्गदर्शनाखाली निकीता देशमुख, आदिती कर्डीले, संजना जोशी, निकीता जांबवलीकर, रजत जाधव, प्राची आंबेडे, संकेत थोरात, समृद्धी पाटील, शुभम गावडे, दिया दिनेश, प्रांजल देशपांडे, मिताली मेहेरकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन हेरिटेज सेलच्या विद्यार्थांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्किटेक्ट हबीब खान, रजिस्ट्रार राजकुमार ओबेरॉय, कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड रिसर्च सेंटर पुणेच्या संचालिका प्रा. जयश्री देशपांडे, परिक्षक डॉ. मीनाक्षी जैन, डॉ. वैशाली लाटकर, आर्किटेक्ट अभिजित साधले आणि आर्किटेक्ट जी. एस. व्ही. सुर्यनारायण मूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button