प्रधानमंत्री आवास योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांची महत्वाची बातमी : स्वहिस्सा भरण्याची तारीख जाहीर
![Expenditure of Rs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pimpri-chinchwad-PCMC-e1635920045174.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये च-होली आणि बो-हाडेवाडी या प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरण्याची तारीख पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे.
15 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत स्वहिस्सा रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये ज्या लाभार्थ्यांची नावे विजेता यादीमध्ये आहेत व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी आपला 10 टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात 15 डिसेंबर पासून येऊन चलनाद्वारे आपली स्वहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
या योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी एकुण 3 हजार 664 सदनिका बांधण्यात येते आहे. त्या पैकी बोऱ्हाडेवाडी येथे 1 हजार 288 व च-होली येथे 1 हजार 442 सदनिका वाटप करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पुर्ण झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/pmay iresult.php या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग 205 व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांसाठी सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे.