TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विसर्जन मिरवणूक : ढोल-ताशा पथक, युद्धकलांची प्रात्यक्षिके अन् आकर्षक रथ !

पिंपरी : पारंपरिक ढोल ताशा पथक, शिवकालीन युध्दकलांची प्रात्यक्षिके, मल्लखांब, आकर्षक रथ सजावट अशा विविध स्वरूपात उत्साहाच्या वातावरणात भोसरी येथे जल्लोषात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये प्रमुख २० गणेश मंडळांचा समावेश होता. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, प्रभारी प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, माजी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, माजी नगरसेवक विजय फुगे, माजी नगरसेविका भीमाबाई फुगे आदींनीही या मंडळांचे स्वागत केले. महापालिकेचे कर्मचा-यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याठिकाणी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, आपत्ती व्यवस्थापन पथक, महापालिकेचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले. सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.


मिरवणुकीत विविध गणेश मंडळांच्या कला व क्रीडा पथकांद्वारे महापालिकेच्या नियंत्रण कक्षासमोर ढोलताशांच्या गजरात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी काठी अशा शिवकालीन साहसी खेळांचे व कलांचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आले. या पथकांमध्ये लहान मुलांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. लहान मुलांनी सादर केलेल्या साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कला व क्रीडा पथकांच्या प्रतिनिधींचा सन्मान देखील यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आला. भर पावसात ढोल पथकांनी धरलेल्या ठेक्याने गणेशभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान, शहरातील इतर विसर्जन घाटांवर देखील गणेश विसर्जन पार पडले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. बहुतांश मंडळांनी स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला. गणपतीदान उपक्रमाला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. जीवरक्षक, अग्निशमन दल, सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button