TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत अवैधरित्या वृक्षतोड, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी : चिखलीतील सेक्टर नंबर-18 शिवतेजनगर ( खदान ) परिसरामध्ये विनापरवाना अवैधरित्या तब्बल 40 झाडांची वृक्षतोड करून त्यांची सर्रास वाहतूक सुरु आहे .या झाडांमध्ये प्रामुख्याने आंबा,सागवान,लिब,बाभूळ , पिंपळ,वडाची अशा जुन्या प्रजातीची झाडे आहेत. मागील काही दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरात बिनदिक्कतपणे वृक्षतोड करत आहेत .यावर प्रशासन काही ठोस पावले उचलतांना दिसत नाही. नागरिकांना झाडे हे ऑक्सिजन देऊन जीवदान देण्याचे काम करतात मात्र त्याच झाडांची कत्तल करून त्यांचा जीव जातोय आणि प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी फॉर्मायका कंपनीतील अवैध वृक्षतोडीबाबतचा असाच एक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर कंपनी मालकाला 45 लाखाचा दंड थोटवण्यात आला.हे प्रकरण ताजे असतानाच चिंचवड मध्ये अशा प्रकारेच मोठ्या प्रमाणावर वृक्षांच्या कत्तली करून त्यांची वाहतूक व विक्री करण्यात येत आहे. सेक्टर नं-18 ओयो सिल्व्हर की हॉटेल शिवतेजनगर चिखली प्राधिकरण ,चिचंवड ( खदान ) याठिकाणी असलेल्या शेकडो झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आलेली आहे.
उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांकडून येथील वृक्षांची मोठ्या प्रमाणवर वृक्षतोड चालू आहे. एकीकडे शासनस्तरावर वृक्ष लागवडीचे संवर्धनाचे उपक्रम सुरु असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वृक्षतोड दुर्लक्ष केले जात आहे. संबंधितांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 कलम ८(१) चे उल्लंघन केले आहे. वृक्षतोड करून संबंधितांनी पर्यावरणाची मोठी हानी केली आहे.त्यामुळे या ठिकाणचे जागा मालक , वृक्षतोड करणारे व वृक्षांची वाहतूक करून विक्री करणारे व ते वृक्ष विकत घेणारे वखारीचे मालक या सर्वांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत . तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून तात्काळ या ठिकाणच्या वृक्षतोडीचा पंचनामा करून तात्काळ कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button