Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

होर्डिंग दिसल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे करा तक्रार; महापालिकेचे आवाहन

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑस्क लावण्यास बंदी आहे. शहरामध्ये अशा अनधिकृत जाहिराती आढळून आल्यास त्याची तक्रार थेट महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांना करा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहरात महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील (मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९) नियम २४४, २४५ तसेच, जाहिरात व फलक नियंत्रण नियम, २००३ च्या अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन महापालिका व खासगी जागेत जाहिरातफलक (फ्लेक्स) उभे करण्यास परवानगी देण्यात येत होती.

ही परवानगी देण्यास १० फेब्रुवारी २०२२ सुरूवात झाली. मात्र, एका जागेची परवानगी घेवून शेकडो ठिकाणी फलक लावले जात होते. त्यामुळे शहर विद्रुप होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑस्क आढळून आल्यास त्यावर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे.

हेही वाचा –  टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणे गरजेचे: अभिनेत्री सीमा बिस्वास

आपल्या भागांत किंवा कोठेही अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑस्क आढळून आल्यास थेट क्षेत्रीय अधिकार्‍यांना फोन करा, असे आवाहन महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे. फोनवरून तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अनधिकृत फलकावर तातडीने कारवाई केली जाईल. तो फलक जप्त करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे विलास लांडे-अजित गव्हाणे यांची रणनिती ‘‘आवळा द्या अन्‌ कोहळा काढा’’!

शहरात कुठेही महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडून जाहिरात फलक, फ्लेक्स लावण्यास परवानगी न घेता वाढदिवस, अभिनंदन, शुभेच्छा, श्रध्दाजंली आणि इतर जाहिरात फ्लेक्स, बॅनर लावून शहर विद्रुपीकरण केले जात होते. तसेच एका जागेची परवानगी घेत अन्यत्र विविध ठिकाणी बॅनर लावले जात असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे जाहिरातफलक लावण्यास शहरात सर्वत्र बंदी घालण्यात आली असून परवानगी धोरणसुद्धा बंद करण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे.

महाईन्यूज-X फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

या क्रमांकांवर करा फोन : उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल – ७३८५७७०५०१, अ) क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे -९४२२३२०६९७, ब) क्षेत्रीय अधिकारी अमित पंडीत – ९८९००१९२३२, क) क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे -९९२३१२६६२६, ड) क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे -७०८३५६९४१८, ई) क्षेत्रीय अधिकारी नाना मोरे – ९५५२५९८४७२, फ) क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप -९९२२५०२४०५, ग) क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे – ७२०८३१६०६०, ह) क्षेत्रीय अधिकारी महेश वाघमोडे- ९८५०८६४७४३

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button