ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

शिकण्यासाठी वेळ घालवला, तर देशाचा विकास : प्रशांत जोगळेकर

शिक्षण विश्व: पीसीयू येथे सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस प्रमाणपत्र वितरण समारंभ

पिंपरी- चिंचवड | उद्योग संस्था आणि शिक्षण संस्था यांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना संशोधन, उद्योजकता आणि कौशल्य आधारित करिअरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) संचालक प्रशांत जोगळेकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे “सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस”(एसआयसी) प्रमाणपत्र वितरण समारंभात जोगळेकर यांनी नवोपक्रम आणि कौशल्य विकासाचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला वेळ नियोजन पूर्वक पद्धतीने शिकण्यासाठी घालवला तर तुमचा, तुमच्या कुटुंबियांचा आणि देशाचा विकास होईल असेही जोगळेकर यांनी सांगितले.

यावेळी सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसचे प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. शशांक द्विवेदी, युएसडीसी टेक्नॉलॉजीचे संचालक हुसेन हाजीते, बाळासाहेब झरेकर, विजय कुलकर्णी, पीसीइटी कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप डी. थेपडे, डॉ. अभिजित बनुबकोडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा       :              भोसरीत श्रीराम नवमी निमित्त दिमाखदार बाईक रॅली; “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमला परिसर!

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, येथील शिक्षण हे कौशल्य व प्रत्यक्ष अनुभव यावर आधारित आहे. प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे म्हणाले की,”एसआयसी” राष्ट्र निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. हुसेन हाजीते यांनी सांगितले की, आता सॅमसंग प्रमाणित अभ्यासक्रम आणि परिणाम आधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. तसेच पुण्यातील निवडक संस्थांमध्ये पीसीयूचा समावेश असल्याचा अभिमान वाटतो. आभार डॉ. अभिजित बनुबकोडे यांनी मानले.

कुलपती तथा पीसीइटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते तसेच प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

व्यवसायासाठी आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत..

डॉ. शशांक द्विवेदी यांनी सांगितले की,”सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस”(एसआयसी) चा ४२ देशांमध्ये मध्ये उद्योग,व्यवसाय विस्तारलेला आहे. जागतिक स्तरावर एसआयसी विद्यार्थ्यांना एआय चे महत्व आणि सातत्याने कौशल्य वृद्धी चे महत्त्व समजून देण्यासाठी काम करत आहे. पीसीइटी कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, युएसडीसी टेक्नॉलॉजी संचालक,एसआयसी प्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून पीसीयू मध्ये शिक्षण संस्था आणि उद्योग संस्था यांच्यातील सहकार्य प्रकल्प विकसित करण्यात आले आहेत. यामुळे पीसीइटी सह पीसीयूच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग, व्यवसायातील अनुभव मिळणार आहे. यामुळे गुणवत्ता वाढ होऊन त्यांच्या मध्ये नेतृत्व गुण आणि उद्योग, व्यवसायासाठी आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button