ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“मी बोलायला नाही, तर तुमचं ऐकायला आले” : आशा भोंडवे

मिशन–PCMC : प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) अधिकृत उमेदवार आशा भोंडवे यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि लोकांच्या थेट सहभागावर आधारित प्रचारामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

किवळे, रावेत व परिसरातील प्रचार दौऱ्यादरम्यान आशा भोंडवे यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळे आणि तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विकासनगर परिसरात नागरिकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “मी बोलायला नाही, तर तुमचं ऐकायला आले आहे. तुमच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय करणे हेच माझे उद्दिष्ट आहे.” त्यांच्या या भूमिकेला नागरिकांकडून दाद मिळताना दिसली.

महिला सक्षमीकरण व रोजगारावर भर

प्रचारात बोलताना आशा भोंडवे यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. बचत गटांच्या माध्यमातून घराघरात लघुउद्योग सुरू करून महिलांच्या हाताला काम देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. “महिला सक्षम झाल्या तर कुटुंब आणि समाज दोन्ही सक्षम होतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. आशा फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करताना महिला सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा      :            पुणेकरांना मेट्रो-बस प्रवास मोफत; राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा जाहीर 

विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक

गेल्या पाच वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर भाष्य करत आशा भोंडवे म्हणाल्या की, ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावरच होणार आहे. “पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी काय काम केले, हे आता जनतेला स्पष्ट झाले आहे. मी केवळ मत मागायला नाही, तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घ्यायला उभी आहे,” असे त्यांनी सांगितले.

तरुण व ज्येष्ठांसाठी विशेष योजना

तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन व रोजगार संधी, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी शासकीय योजनांचा लाभ थेट घरापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भोंडवे परिवाराच्या सामाजिक कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण आहे.

नागरिकांचा विश्वास

स्थानिक नागरिक विठ्ठलराव जगताप म्हणाले, “आशाताई केवळ निवडणुकीपुरत्या दिसत नाहीत. त्या नेहमीच लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. त्यामुळे यावेळी आम्ही त्यांनाच पाठिंबा देणार आहोत.” महिला सक्षमीकरण, रोजगार आणि लोकसंवादाच्या जोरावर प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

प्रभाग १६ मधील प्रत्येक कुटुंबाच्या अडचणी मला माझ्या स्वतःच्या वाटतात. महिलांच्या हाताला सन्मानजनक रोजगार, तरुणांसाठी संधी आणि ज्येष्ठांसाठी सुरक्षित व सन्मानाचे जीवन देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. राजकारण नव्हे, तर सेवा हेच माझे ध्येय आहे.

– आशा भोंडवे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 16.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button